Devi Singh Shekhawat
Devi Singh Shekhawat Sarkarnama

Devi Singh Shekhawat Passed Away: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat News : देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर होते.

Pune News : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज (शुक्रवार) पुण्यात निधन झाले.

दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

 Devi Singh Shekhawat
Shatrughan Sinha : मोदी PM होऊ शकतात तर तेजस्वी यादव का नाही ? TMC खासदाराचा सवाल

माजी आमदार डाँ. देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर होते. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभा पाटील यांचा विवाह 7 जुलै 1965 रोजी झाला होता.

कोण होते देवीसिंह शेखावत

  • देवीसिंह शेखावत यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते.

  • त्यांनी 1972 मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली.

  • विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते.

  • देवीसिंह शेखावत 1985 मध्ये अमरावतीमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in