Pune Festival : पुणे फेस्टिव्हलमध्ये भाजपा आघाडीवर कॉंग्रेस पिछाडीवर !

एकेकाळी माजी मंत्री कलमाडी यांचे पुण्यावर राज्य होते. पुणे महापालिकेत त्यांची एकहाती सत्ता होती.
Pune Fastival
Pune FastivalSarkarnama

पुणे : पुणे फेस्टिव्हल (Pune Festival) हा खरेतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा हक्काचा महोत्सव. माजी मंत्री सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हक्काचे व्यासपीठ. मात्र, आज चित्र उलटे पाहायला मिळाले. यापूर्वी या फेस्टिव्हलमध्ये कधीच न फिरकेलेले भाजपाचे (Bjp) अनेक नेते-कार्यकर्ते पहिल्या रांगेत तर कॉंग्रेसचे (Congress) अनेक नेते-कार्यकर्ते दुसऱ्या-तिसऱ्या रांगेच्या मागे असे चित्र होते.

Pune Fastival
अमित शाह आणि राज ठाकरेंची खरच भेट होणार का?,बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितले

एकेकाळी माजी मंत्री कलमाडी यांचे पुण्यावर राज्य होते. पुणे महापालिकेत त्यांची एकहाती सत्ता होती. मात्र, काळ बदलला. ‘कॉमन वेल्थ’ स्पर्धांच्या घोटाळ्यात कलमाडी यांना तुरूंगात जावे लागले. कलमाडी यांना कॉंग्रेसने पक्षातून काढून टाकले. त्यानंतर अनेक वर्षे कलमाडी पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.

Pune Fastival
Devendra Fadanvis : पुरंदरचे विमानतळ ठरलेल्या जागेवरच !

दोन वर्षे कोरोनात गेली. यावर्षी फेस्टिव्हलची तयारी जोरात करण्यात आली. तब्बेतीत सुधारणा झाल्याने कलमाडी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मधल्या काळात कलमाडी यांना पक्षातून काढून टाकले तरी कॉंग्रेसचे जुने नेते-कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. त्यातील अनेकजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, त्यांना दुसऱ्या-किंवा तिसऱ्या रांगेच्या मागे जागा मिळाली. काळ बदलत असतो. राजकारणात काहीही घडत असते, याचा प्रत्यय कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा आला.

फेस्टिव्हलच्या उदघाटन कार्यक्रमात ‘सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी' अशा घोषणा पूर्वी दिल्या जायच्या. फेस्टिव्हलसाठी देशभरातून लोक येत असत. केंद्रीय मंत्री,अभिनेते, अभिनेत्री यांची मांदीयाळी हे या फेस्टिव्हलचे वैशिष्टय होते. मात्र, गेल्या काही वर्षात या फेस्टिव्हलला उतरती कळा लागली. यावर्षी मात्र, त्यात सुधारणा दिसली. भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मात्र, उद्घाटनाच्या साऱ्या कार्यक्रमावार कॉंग्रेसवऐवजी भाजपाची छाप होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com