Pune Ganesh Festival : पुण्याला महापौर नाहीत, मग विसर्जन मिरवणुकीचा मानकरी कोण?

परंपरेनुसार विसर्जनादिवशी सकाळी दहा वाजता महापौरांच्या हस्ते मंडईतील लोकमान्य टिळक तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरवात होते.
pune Ganesh Visarjan
pune Ganesh Visarjansarkarnama

पुणे : विसर्जन मिरवणुकीची (Pune Ganesh Festival) सुरूवात पुण्याच्या महापौरांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र, महापालिकेची मुदत संपल्याने यावर्षी महापौर नाहीत. त्यामुळे मिरवणुकीची सुरूवात कुणाच्या हस्ते होणार याची चर्चा सुरू झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरूवात करण्यात यावी, असेही सुचविण्यात येत आहे.

pune Ganesh Visarjan
याकूबचा मृतदेह ताब्यात दिला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, मग त्यांना जबाबदार धरायचे का ?

परंपरेनुसार विसर्जनादिवशी सकाळी दहा वाजता महापौरांच्या हस्ते मंडईतील लोकमान्य टिळक तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जातो. त्यानंतर मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरूवात होते. ढोल, ताशांच्या गजरात ही पापंरिक मिरवणूक सुरू होते. त्यापाठोपाठ मानाचे इतर गणपती मिरवणुकीत सहभागी होतात.त्यानंतर सुमारे २५ ते ३० तास विसर्जन मिरवणूक सुरू असते. राज्यात सर्वात जास्त वेळ चालणारी मिरवणूक पुण्याची असते.

pune Ganesh Visarjan
अशी असेल पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

यावेळी महापालिकेच्या निवडणुका वेळेत होऊ शकल्या नाहीत. महापौर मुरलीधर मोहोळ यांची महापौरपदाची मुदत १४ मार्चला संपली. त्यामुळे महापौर नसतील तर मिरवणुकीचा शुभारंभ कोण करणार अशी चर्चा गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. त्यावर उपाय म्हणून निवडून आलेल्या प्रमुख लोकप्रतिनिधींच्या हस्ते मिरवणुकीची सुरवात व्हावी, असे कार्यकर्ते सुचवू लागले आहेत.

पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण राज्यभर असते. मिरवणूक पाहण्यासाठी पुण्याबाहेरून हजारो लोक येतात. मानाचे गणपती आणि त्यानंतर सुमारे २५ ते ३० चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्या करतात. तरीही रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. विशेषत: तरूणाईमध्ये मिरवणुकीचे ‘थ्रिल’ असते.

मिरवणुकीची सुरवात करून देण्यासाठी महापौर नाहीत, अशी वेळ पुण्याच्या मिरवणुकीच्या इतिहासात यापूर्वी बहुधा आलेली नाही. मात्र, यावर्षी प्रथमच ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून लोकप्रतिपिधींच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ करणे उचित ठरेल, असे मत गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com