पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

पुणे विभागाचे आयुक्त असल्याने विभागातील सर्व पाच जिल्ह्यातील कोरानाची स्थिती हाताळण्यात राव महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
rao.jpg
rao.jpg

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून दोन महिन्यांपूर्वी त्यांना पहिल्यांदा लागण झाली होती. पुणे विभागाचे आयुक्त असल्याने विभागातील सर्व पाच जिल्ह्यातील कोरानाची स्थिती हाताळण्यात राव महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.(Pune Divisional Commissioner Saurabh Rao infected corona for the second time) 

कोराना काळात राव हे रोजच कार्यालयात उपस्थित असतात.पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीलाही राव उपस्थित होते. त्याच दिवशी त्यांनी कोरोनाची लस घेतली. मात्र, आज त्रास होऊ लागल्याने त्यांनी टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आठ दिवस ते विलगीकरणात राहणार आहेत. राव यांच्या कामाच्या पद्धतीमुळे गेल्या आठवड्यात पुण्यावर आलेले ऑक्सिजन तुटवड्याचे जीवघेणे संकट टळले. तळोज्यातून तसेच चाकण येथून पुण्याला ऑक्सिनजनचा पुरवठा होतो. मात्र,ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत तांत्रिक बिघाड झाल्याने उत्पादन बंद झाले. झालेला बिघाड दुरूस्त होऊन पुन्हा उत्पादन सुरू होण्यासाठी सोळा तासांचा कालावधी लागणार होता. पुण्यातील सर्वच रूग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. राव यांनी तत्काळ सुत्रे हलवून ओरिसातून विदर्भासाठी जाणारा ५८ टन ऑक्सिजनचा पुरवठा तसेच रायगडमधून २० टन ऑक्सिजन रात्रीतून मिळविला त्यामुळे पुण्यावरून ॲक्सिजन कमतरतेचे संकट टळले.

राव गेले सुमारे वर्षभर कोरोना संकट काळात पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम करीत आहेत. या काळात पुण्यात तसेच पुणे विभागातील सातारा व सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत गेले. मात्र, राव यांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्यात यश मिळविले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in