पुणे जिल्हा दूध संघ : `अ` वर्गमध्ये केशरताई यांच्याऐवजी स्वप्निल ढमढेरे यांना उमेदवारी.

आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यासाठी एक जागा जागा मिळवली..
Katraj Dairy Election
Katraj Dairy Electionsarkarnama

शिरूर : शिरूर तालुक्‍यातील अ वर्ग मतदार संघातील उमेदवारी बदलावी लागली असली तरी; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) निवडणुकीत उमेदवारीमध्ये शिरूर तालुक्‍याला झुकते माप दिले असल्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा दूध संघासाठी शिरूर तालुक्‍यातून "अ' वर्ग मतदार संघातून जातेगाव बुद्रूक येथील केशरताई पवार यांना उमेदवारी दिली होती. तथापि, मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत शिरूर तालुक्‍यातून "अ' वर्ग मतदार संघातून आता तळेगाव ढमढेरे येथील स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांना उमेदवारी दिली असून, केशरताई पवार यांना महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी देताना त्यांना जिल्हापातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाने दिली आहे. याशिवाय भटक्‍या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून रांजणगाव सांडस येथील निखिल सुभाष तांबे यांना उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Katraj Dairy Election
नऊ मंत्र्यांनी विनंती करताच राज्यपाल विरघळले... विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार

शिरूर तालुक्‍यातील 39 गावे आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडली असल्याने, समन्वय राखण्याच्या दृष्टिकोनातून सर्व विभागाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आमदार ऍड. अशोक पवार यांनी पक्ष श्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्षाची बैठक होऊन, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलमधून शिरूर तालुक्‍यातील तिघांना जिल्हा दूध संघाची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याचे काळे यांनी सांगितले.

Katraj Dairy Election
जयंत पाटील हे कौतुक करतायत की टोमणे मारतायात, हेच शंभूराज देसाईंना कळेना!

स्वप्नील ढमढेरे, केशरताई पवार व निखिल तांबे अशा तिघांना उमेदवारी मिळाली असून, पक्षाचे हे अधिकृत उमेदवार जिल्हा दूध संघावर निश्‍चितच विजय मिळवतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com