Congress Leader Join BJP : पुण्यात काँग्रेसला हादरा : किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपत प्रवेश

मंचर नगरपंचायतीत कमळ फुलविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याची सुरुवात अश्विनी शेटे यांच्या पक्ष प्रवेशातून झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
 Ashwini Shete joins BJP
Ashwini Shete joins BJPSarkarnama

मंचर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाने (BJP) पुणे (Pune) जिल्ह्यात पक्ष बळकटीकरणासाठी बारामतीपाठोपाठ आंबेगाव तालुक्यात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी कॉंग्रेस (Congress) पक्षाला हादरे देण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संजय (बाळा) भेगडे, आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा किसान काँग्रेसच्या अध्यक्षा तथा आंबेगाव तालुक्यातील मंचरच्या माजी सरपंच आश्विनी शेटे (Ashwini Shete) यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह पुणे येथे भाजपत प्रवेश केला. (Pune District Kisan Congress president Ashwini Shete joins BJP)

दरम्यान, कॉंग्रेसचे आणखी काही कार्यकर्ते भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत, असे पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात (मंचर) यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.

 Ashwini Shete joins BJP
Nashik Graduate Constituency : उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपवर डाव उलटवणार : ‘या’ उमेदवाराला देणार पाठिंबा?

अश्विनी शेटे यांनी मंचरचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. माजी खासदार लोकनेते (स्व) किसनराव बाणखेले यांच्या कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व मंचर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व कॉंग्रेस या पक्षांचे वर्चस्व होते.

 Ashwini Shete joins BJP
मोठी बातमी : राष्ट्रवादीला मोठा धक्का; लोकसभेतून खासदार बडतर्फ, संख्याबळ घटले

मंचर नगरपंचायतीची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीवर भाजपचे नेते संजय थोरात यांनी लक्ष केंद्रित करून व्यूह रचना आखली आहे. येथे कमळ फुलविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याची सुरुवात अश्विनी शेटे यांच्या पक्ष प्रवेशातून झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 Ashwini Shete joins BJP
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत चालताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदाराचा मृत्यू

काँग्रेसच्या अश्विनी शेटे म्हणाल्या “मंचर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही काही सहकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.”

 Ashwini Shete joins BJP
Kadam Vs Jadhav : गुहागरचा पुढचा आमदार शिंदे गटाचा करण्याची जबाबदारी माझी : रामदास कदमांचे जाधवांना चॅलेंज

थोरात म्हणाले “मंचर शहरातील १७ प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील. आत्तापर्यंत तत्कालीन पालकमंत्री, खासदार गिरीश बापट व विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून रस्ते व नागरी सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.”

 Ashwini Shete joins BJP
Kokan News : कोकणात शिवसेनेच्या विरोधात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, शिंदे गट एकत्र

अश्विनी शेटे यांचा सत्कार पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, ॲड. धर्मेंद्र खांडरे, थोरात व आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अश्विनी शेटे यांना पुढील वाटचालीसाठी शु

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com