भाजप उमेदवाराला पोलिंग एजंटच मिळाला नाही

वेल्हे तालुक्यातून पुणे जिल्हा बॅंकेसाठी एकूण ९७ टक्के मतदान
pdcc bank election-Velhe

pdcc bank election-Velhe

Sarkarnama

वेल्हे (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (pdcc bank election) रविवारी (ता. २ जानेवारी) वेल्हे तालुक्यातून ९७.१४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील ३५ पैकी ३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी तथा तालुका सह्ययक निबंधक आर. एम. जगताप यांनी दिली. दरम्यान, भाजपच्या (bjp)उमेदवाराना वेल्ह्यात मतदान प्रतिनिधीसुद्धा (पोलिंग एजंट) मिळाला नाही. (Pune District Bank's election 97 percent voting from Velhe taluka)

वेल्हे तालुक्यातून जिल्हा बँकेवर सलग सातव्यांदा बिनविरोध निवड झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) ज्येष्ठ नेते रेवणनाथ दारवटकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार वेल्हे पंचायत समितीच्या माजी सभापती निर्मला जागडे यांनी वेल्हे जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. जागडे यांच्या विजयानंतर तालुक्याला जिल्हा बॅंकेचे दोन संचालक मिळणार आहेत.

pdcc bank election-Velhe

लांडेवाडीची बैलगाडा शर्यत आमच्या विरोधी नेत्यांच्या डोळ्यात खुपली : आढळरावांचा रोख कुणाकडे

पुणे जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने वेल्हे तालुक्यास प्रथमच महिला उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळ नऊपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी बारापर्यंतच ९० टक्के मतदान झाले होते, तर दुपारी दोनपर्यंत ३५ पैकी ३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता, तर एक मतदार मयत असल्याने जवळजवळ मतदान प्रक्रिया दुपारी तीनपर्यंतच संपल्यात जमा होती.

pdcc bank election-Velhe

अजितदादांनी कार्यकर्त्यांनाही दुखावले नाही आणि नियमही मोडला नाही!

मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवणनाथ दारवटकर, कात्रज दूध संघाचे संचालक भगवानराव पासलकर, वेल्हे पंचायत समितीचे उपसभापती अनंता दारवटकर, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी मांगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकरराव भुरूक, भगवानराव बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, जिल्हा युवकचे उपाध्यक्ष संदीप खुटवड, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, गुलाबराव रसाळ, विलास पांगारे, विकास नलावडे, शंकर रेणुसे, संतोष मोरे आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

pdcc bank election-Velhe

गृहमंत्र्यांच्या कट्टर समर्थकाकडून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण : आढळरावांचा गंभीर आरोप

वेल्हे तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान प्रतिनिधीसुद्धा (पोलिंग एजंट) मिळाला नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील जागडे या वेळी मतदान केंद्राच्या बाहेर उभे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com