रमेशआप्पा आठव्यांदा रिंगणात; अजितदादांचे विश्वासू सहकारीही निवडणुकीच्या तयारीत

दौंड तालुक्यासाठी दुसऱ्या संचालकपदाची मागणी करण्यात आली आहे.
Ramesh Thorat
Ramesh Thoratsarkarnama

दौंड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune District Bank Election) संचालकपदाकरिता दौंड तालुक्यातून बॅंकेचे विद्यमान चेअरमन तथा माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांची 'अ' गटातून निवड निश्चित मानली जात आहे. तर दुसऱ्या संचालकपदाच्या जागेसाठी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे इच्छूक आहेत. थोरात हे सलग ३७ वर्षे बॅंकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.

Ramesh Thorat
कोरे अन् आवाडेंच्या बरोबर जिल्ह्याच्या राजकारणात बदल घडवणार : महादेवराव महाडिक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रमेश थोरात हे विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 'अ' गटात १२० मतदार असून बहुतांश मतदार रमेश थोरात यांच्या बाजूने आहेत. निवडणुकीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, दौंड तालुक्यातून 'अ' गटासाठी अन्य कोणी उमेदवार आहे किंवा नाही, याविषयी माहिती नाही. बिनविरोध होऊ नये याकरिता उमेदवार देण्याचा प्रयत्न होईल, तरी त्या निवडणुकीत एकतर्फी विजय निश्चित आहे. सोमेश्वर कारखान्यासारखी ही निवडणूक एकतर्फी होईल. दौंड तालुक्यासाठी दुसऱ्या संचालकपदाची मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी त्या बाबत निर्णय घेतील.

दौंड तालुक्यातील दुसऱ्या संचालकपदाच्या जागेसाठी पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ते 'अ' (विकास सोसायटी मतदारसंघ) 'क' (नागरी सहकारी बॅंका व पतसंस्था) व 'ड'(ग्राहक संस्था, पाणीपुरवठा, वाहतूक संस्था, सर्वसाधारण संस्था,आदी संस्था मतदारसंघ) मतदारसंघातून इच्छूक आहेत. बॅंकेच्या २१ संचालक पदांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून ६ डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ डिसेंबर रोजी छानणी होणार असून मतदान २ जानेवारी तर मतमोजणी ४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

Ramesh Thorat
राष्ट्रवादीकडून बँकेवर बिनविरोध अन् आता पाटलांना साथ दिल्यानं भरणेंची प्रतिष्ठा पणाला

चौकट : ११ हजार ३२९ कोटी रूपयांच्या ठेवी

सन १९१७ मध्ये स्थापन झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे सप्टेंबर २०२१ अखेर ११ हजार ३२९ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. बॅंकेचे १० हजार ९६४ सभासद असून त्यापैकी सहकारी संस्था सभासद ९ हजार २३१ इतके आहेत. बॅंकेचा ढोबळ नफा २८२ कोटी रूपये तर निव्वळ नफा ५५ कोटी रूपये इतका आहे. मार्च २०२१ अखेर बॅंकेची एकूण उलाढाल १९ हजार ४३९ कोटी रूपये इतकी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com