पुणे जिल्ह्यात दुपारी बारापर्यंत सरासरी ४० टक्के मतदान

सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे
sar21.jpg
sar21.jpg

पुणे : जिल्ह्यातील साडेसहाशे ग्रांमपंचायींसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत जिलह्यात सरासरी ४० टक्के मतदान झाले. सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. बारामती, जुन्नर, खेड तसेच शिरूर, मावळ, भोर, व पुरंदर तालुक्यात मतानाला उत्साह आहे.

मतदान शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जुन्नर तालुक्यात 59 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू
असून तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या 178 प्रभागातील 403 जागांसाठी होणाऱ्या निवडणूक मतदानासाठी 209 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान शांततेत व सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले ओतूर, आळे, राजुरी, वारुळवाडी, पिंपरिपेंढार, शिरोली बुद्रुक आदि प्रमुख गावांचा समावेश आहे. एक लाख 42 हजार 341 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 69 हजार 676 महिला व 72 हजार 665 पुरुषांचा समावेश आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. पहिल्या चार तासात 39हजार 151 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात 17,683 महिला व 2१,468 पुरुष मतदारांचा समावेश आहे.मतदानाची टकेक्वारी 32.64 इतकी आहे. भोर तालुक्यात पहिल्या चार तासात ३९.२३ टक्के मतदान झाले.तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमधील ७७० उमेदवार निवडले जाणार आहेत. सकाळी साडेसात वाजता सुरळीतपणे सुरु झाली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तालुक्यात ३९.६३ टक्के मतदान झाले. तालुक्यातील ६९ हजार ३४५ मतदारांपैकी २५ हजार ९२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १२ हजार ८८ महिला मतदार आणि १३ हजार ८३८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. अशी माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली. तालुक्याच्या वीसगाव खो-यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. खानापूर, भाबवडी व अंबाडे येथे मतदारांची गर्दी असूनही शांततेत मतदान सुरु होते. या ग्रामपंचायतींमध्ये सकाळी साडेअकरा वाजता ५० टक्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
Edited by : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com