Deputy Collector Ajay Pawar
Deputy Collector Ajay Pawar

मनी लाँडरींगप्रकरणी पुण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ईडीचं बोलावणं

गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) पुण्यात नुकतीच छापेमारी केली आहे.

मुंबई : वक्फ बोर्ड जमीन (Waqf Board land scam) गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) पुण्यात नुकतीच छापेमारी केली आहे. याप्रकरणी ईडीने पुण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजय पवार (Ajay Pawar) यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावल्याचे वृत्त 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यातील वक्फ मंडळाच्या जमीनींच्या गैरव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत (Maharashtra State Board) नोंदणीकृत असलेल्या संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केल्याप्रकरणी तसेच काही जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी जालना (Jalna) जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन परतूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Deputy Collector Ajay Pawar
केवळ नेताजींमुळेच स्वातंत्र्य मिळालं, हे म्हणणं मुर्खपणाचं! कन्येनंच सुनावलं

तर नुकताच ईडीनेही पुण्यातही छापेमारी केली होती. वक्फ मंडळात मनी लाँडरिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. याप्रकरणी ईडीकडून बुधवारी अजय पवार यांना चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, पुण्यातील मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांसबंधी हे छापे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आर्यन खान प्रकरणात केंद्रीय संस्थांच्या विरोधात सातत्याने बोलणारे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ईडीचे छापे पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते.

यावर मलिकांनी खुलासा केला होता. माझ्याकडे अल्पसंख्यांक विभागाचा कारभार आल्यानंतर वक्फ बोर्डाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. वक्फ बोर्डाशी संबंधित व्यक्तींवर छापे पडल्याने नवाब मलिक यांच्या घरात ईडी घुसल्याचे अनेकांना वाटले. पण तसे काही नाही. मी वक्फ बोर्डात स्वच्छता अभियान सुरू केले आहे. त्यामुळे माझ्या स्वच्छता मोहिमेत ईडीचे सहकार्य मिळाले तर मी त्याचे स्वागत करेन. अशा कारवायांना मी घाबरण्याचे कारण नाही. माझी लढाई अन्यायाविरोधात आहे. केंद्रीय संस्थांमध्ये क्लीन अप करण्याची माझी मोहीम आहे. ती सुरूच राहणार असल्याचा दावा त्यांनी केला होता.

पुणे, बदलापूर, बीड ,परभणी ,जालना येथे वक्फ बोर्डाकडून फसवणुक झाल्याबाबत FRI दाखल करण्यात आले आहेत. बीड येथे फसवणूक प्रकरणात एका उपजिल्हाधिकाऱ्याला अटक झाली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिस सुरवातीला तयार नव्हते. मी स्वतः पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी बोललो. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ईडी माझ्या घरात घुसण्याचे कारण नाही. घुसली तरी मला त्याचे भय नाही, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in