Pune News : पुणे हादरलं ; पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून

Pune News : येरवड्यात पांडू लमाण वस्ती येथे ही घटना घडली.
Pune News
Pune News sarkarnama

Pune News : पूर्ववैमनस्यातून दुहेरी हत्याकांड झाल्यानं पुणे हादरलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री येरवडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड अशी हत्या झालेल्या दोघांची नावं असल्याची माहिती आहे. घटनेमुळं खळबळ माजली आहे. (pune latest news)

दोघेही सराईत गुन्हेगार असून याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून तलवार व पालघनाने वार करीत दोघांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. येरवड्यात पांडू लमाण वस्ती येथे ही घटना घडली.

Pune News
Jitendra Awad : आव्हाडांवर कारवाईसाठी दबाब आणणारा तो 'चाणक्य' कोण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक जण पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरुन जात असताना त्यांना ८ ते १० जणांच्या टोळक्याने अडविले. त्यानंतर आरोपींनी दोघांवर हल्ला करुन त्यांचा निर्घुण खून केला. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा पळून गेला. येरवडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in