Pune Crime News : गर्लफ्रेण्डचा लग्नाला नकार अन् राजकीय नेत्यांना धमकीचे काॅल; काय आहे प्रकरण?

Pune Crime News : "पार्किंगमधील इनोव्हामध्ये गुपचूप पैस ठवा.."
Pune Crime News :
Pune Crime News : Sarkarnama

Threatening phone calls to political leaders : पुणे शहरात (Pune City News) राजकीय नेत्यांना मागील काही दिवसांपासून धमकी येण्याचे प्रकार सुरू आहेत. नेत्यांकडे ३० लाखांच्या खंडणीची (Extortion News) मागणी केली जात होती. नेत्यांना जीवे मारण्याचा इशारा ही देण्यात आला होता. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

Pune Crime News :
BJP News : कढी पत्यासारखं भाजप त्यांना बाहेर फेकणार..; अनिल अँटनींच्या BJP प्रवेशावर लहान भाऊ संतप्त

गर्लफ्रेण्डने लग्नासाठी नकार दिल्यामुळे हा राग मनात ठेवून, तिच्यावर सूड उगवण्यासाठी तरूणाने तिच्या नावाने या नेत्यांना धमक्या दिल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. इम्राल शेख (वय अंदाजे २५ वर्ष, रा. कोंढवा) असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोरपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाकडून इम्राल शेख याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला पहिल्यांदा धमकी आली होती. यानंतर भाजप नेते व पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीकडे खंडणी मागण्यात आली होती. तसेच काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनाही खंडणीसाठी व्हॉट्सअॅपवर मेसेज केला गेला होता. धमकीचे फोन ही त्यांना आले होते. यानंतर काल (दि.६ एप्रिल) गुरूवार रोजी पिंपरी-चिंचवडचे भाजप अध्यक्ष व भोसरी मतदारासंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्या कार्यालयातील मोबाईलवरही ३० लाख रुपयांची खंडणी मागणारा मॅसेज आला होता.

या सगळ्या धमक्यांचे प्रकरणांमध्ये आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत एकसारखी दिसत होती. या धमक्या आणि खंडण्यांच्या प्रकरणात एका मुलीच्या नावाने खंडणी मागितली जात होती. पुण्यातील खराडी या भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये एक इनोव्हा गाडी थांबलेली आहे, या गाडीत पैसे ठेवायला आरोपी सांगत होता.

Pune Crime News :
Pune By-Elelction: पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग; काँग्रेसकडून 'या' नेत्याचे नाव आघाडीवर

गर्लफ्रेंडची बदनामी करण्याचा हेतूने हा प्लॅन तयार केला होता. मुलीची बदनामी करण्याचा हेतूनेच अशा प्रकारच्या कारवाया आरोपी इम्राल कडून करण्यता येत होते. गर्लफ्रेंण्डच्या नावाने तो राजकीय नेत्यांना धमकीचे फोन, मॅसेज करायचा. त्या संबंधित मुलीचा गाडीचा नंबर सांगून, त्यात पैसे ठेवण्यास तो सांगत होता, अशी प्राथनिक माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com