Pune Crime News : कितीही कारवाया करा; पुण्यात कोयत्याची दहशत कायम!

Pune Crime News : हातावर आणि डोक्यात त्यांनी कोयत्याने सपासप वार केले.
Pune Crime News
Pune Crime Newssarkarnama

पुणे : पुणे पोलिसांनी आता सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यान्वे कारवाईचा बडगा उगारायला सुरू केली आहे. मात्र शहराच्या काही भागांमध्ये अद्यापही कोयते - हत्याऱ्यांच्या धाक दाखवत दहशत निर्माण करण्याच्या घटना सुरूच असल्याचे सुरू आहे. मागील दोन दिवसांतच पुण्यातल्या शिवाजीनगर, हडपसर, बंडगार्डन या भागांमध्ये टोळक्याकडून दहशत पसरवल्याचे घटना घडले आहेत.

कोयता उगारून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत या हल्ल्या प्रकरणात तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा, दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर या चौघांपैकी सराईत गुन्हेगार असलेला दीपक ऊर्फ दीपू काकाराम शर्मा (वय १९, रा. मगरपट्टा, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी यांच्यामध्ये वाद घडून आला होता. या टोळक्यातील सगळे १६ जानेवारीच्या उशीरा रात्री फिर्यादी काळे याच्या घराच्या नजीक आले होत. त्यांना घराजवळच झोपलेले पाहिल्यानंतर टोळक्याने, काळे यांच्यावर कोयत्याने केला हल्ला होता. काळे यांच्या हातावर आणि डोक्यात त्यांनी कोयत्याने सपासप वार केले. काळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर पत्नी आणि मुलगा घरातून बाहेर धावत आले. यावेळी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी टोळक्याने दिली.

Pune Crime News
Thackeray Vs Shinde : मोठी बातमी : शिंदे गटाच्या सात जिल्हाप्रमुखांवर ठाकरेंचा आक्षेप ; आयोगावर समोर केला दावा!

हडपसरमध्ये तरुणावर कोयत्याने वार :

वरातीत नाचण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना, हडपसर परिसरातील गांधी चौक येथे घडली. या प्रकरणी अमरदीप भालचंद्र जाधव (वय १९, रा. शंकरमठ, हडपसर) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर विलास सुकळे (वय २२, रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्वारगेट परिसरात चाकू हल्ल्यात तरुण जखमी :

आपल्यातील वाद मिटवू या बहाण्याने एका तरुणाला बोलावून त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले गेले. सदर घटना १५ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या स्वारगेट येथील शंकरशेठ रस्त्यावर घडली. आशितोष यादव (वय ४०, रा. कासेवाडी) असे या हल्ल्यात जखमीचे नाव आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून दोन जणांना अटक केली गेली आहे. रवी ऊर्फ संतोष सिद्धू पामाकोळ (वय २४), प्रथम ऊर्फ मनोज विनोद ससाणे (वय २१, दोघेही रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.

Pune Crime News
Gulab Nabi Azad : आझादांचं बंड तीन महिन्यांतच थंड; 30 संस्थापक सदस्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

तरुणाला रॉडने मारहाण :

कुत्र्याला घेउन फिरतो या कारणावरून शिवीगाळ करत, एका तरुणाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना १५ जानेवारी रोजी ताडीवाला रोड येक्षे रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेत गणेश कांबळे (वय २८, रा. ताडीवाला रोड) हा जखमी झाला आहे. कांबळे याने फिर्याद दिल्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in