Pune Crime ! पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात याप्रकरणी छापा टाकण्यात आला होता.
Pune Crime ! पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर गुरुवारी धाडसत्र राबवले. यामध्ये शंभरहून अधिक जणांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातही याप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. या ठिकाणाहून दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा निश्चित करण्यासाठी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. याप्रकरणी आता बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime ! पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल
Eknath Shinde| न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया: मी नाही....

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, रा. शिवनेरी नगर कोंढवा) यांच्यासह 60 ते 70 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

दोन दिवसांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं. तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. नाशिकमध्येही पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी कोंढव्यातील पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकत काही साहित्य जप्त करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com