मोठी बातमी : पंजाबी गायक सिद्धू मुसावालाच्या हत्येचं पुणे कनेक्शन

दोघेही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळी मधले असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.
Sidhu musawala case News Updates, Pune Latest Marathi News
Sidhu musawala case News Updates, Pune Latest Marathi Newssarkarnama

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला (sidhu musawala)यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी (ता.२९) सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणातील आरोपींचे पुणे कनेक्शन (pune connection) समोर आले आहे. यातील दोन आरोपी हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. (Sidhu Musawala case latest news)

सौरभ महांकाळ, संतोष जाधव अशी पुण्यातील दोन आरोपीची नावे आहेत. या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. संतोष जाधव याच्यावर मंचर येथे गुन्हा दाखल आहे. त्याला मोक्का लावण्यात आला आहे. दोन्ही संशयितांचा पोलिस शोध घेत आहे. या दोघांविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळी मधले असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.

Sidhu musawala case News Updates, Pune Latest Marathi News
MNS : वसंत मोरेंची बैठकीला दांडी ; मोरे अन् पदाधिकाऱ्यांतील संघर्ष तीव्र

ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच्या खून प्रकरणात संतोष जाधव फरार असून पुणे गुन्हे शाखा संतोषच्या शोधात आहे. मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांचा सी सी टिव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्या बद्दल दिली होती.

या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com