एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी अडचणीत; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवला आहे.
एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी अडचणीत; पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
Kiran Gosavisarkarnaam

पुणे : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने (NCB) किरण गोसावी (Kiran Gosavi) याला साक्षीदार बनवला आहे. काही फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गोसावी आता पुणे पोलिसांच्या (Pune Police) रडारवर आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत असून अद्याप तो हाती लागलेला नाही. त्याच्याविरोधात आता पोलिसांनी लुकआऊट नोटीस (LookOut Notice) बजावले आहे. त्यामुळे त्याला आता देश सोडून पळून जाता येणार नाही.

क्रुझ ड्रग प्रकरणात एनसीबीने काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणातच गोसावी याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावरून एनसीबीवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे गोसावी वादात अडकला आहे. त्यातच त्याच्याविरोधातील काही फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत.

Kiran Gosavi
शरद पवारांवरील टीका भोवणार; अनंत गीते डेंजर झोनमध्ये

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी गोसावी याचा शोध सुरू केला आहे. गोवासीवर फरासखाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पण अद्याप तो हाती लागलेला नाही. तो परदेशात पळून जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. त्याला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी ही नोटीस बजावल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

गोसावीने अनेकांना फसवलंय!

पुणे पाठोपाठ पालघरमधील तरुणांनाही त्याने परदेशात नोकरी देतो, असे सांगून गंडा घातला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांची त्याने दोन वर्ष आधी फसवणूक केली होती. या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावी याने उकळली असल्याचे समोर आल्याने किरण गोसावी अडचणीत आला आहे.

Kiran Gosavi
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा असाही फंडा.. घातला अनेकांना गंडा!

नवी मुंबई येथील के. पी. इंटरप्राईज या कार्यालयातून तो हे फसवणुकीची रॅकेट चालवत होता,असे उत्कर्षने सांगितलं. दोन दिवसांपूर्वी उत्कर्ष याने आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पहिल्या व आर्यन सोबत सेल्फी असलेला किरण गोसावी याच व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे उत्कर्षला समजले. दोन तीन वर्षांपूर्वी उत्कर्ष व त्याचा भाऊ आदर्श नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची सुरुवातीला फेसबुकवरून मैत्री झाली. उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावी याने दीडलाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावी याच्या के.पी.इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व व्हिसा दिला.

कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व व्हिसा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही धक्का बसला. इथून ते पालघर येथे आले व पालघर येथे आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत या प्रकरणी त्यांनी केळवा सागरी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र केळवे पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. म्हणून दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष याने सांगितले आहे. गोसावी याने माझ्यासारख्या अनेक तरुणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता असल्याचे उत्कर्ष याने सांगितले असून आमच्या फसवणूक प्रकरणांमध्ये किरण गोसावी याला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे सांगितले.

Related Stories

No stories found.