Pune By-Electon : चिंचवड आणि कसब्यात आघाडीच्या विजयाचे जयंत पाटलांनी मांडले असे गणित!

Jayant Patil : जयंत पाटील रंगले प्रचारात...
Pune By-Electon : Jayant Patil
Pune By-Electon : Jayant PatilSarkarnama

पिंपरी : चिंचवड (Chinchwad By Election) विधानसभा पोटनिवडणुकीतील आघाडीचे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचाराचा नारळ आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते वाढविण्यात आला. यावेळी त्यांनी काटेच शंभर टक्के कसे निवडून येणार हे सांगितले.

Pune By-Electon : Jayant Patil
Governer Koshyari; उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर... वेळेत का झाले नाही?

"राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत आघाडीने दणदणीत यश संपादन केले. पाचपैकी फक्त एकच जागा भाजपला मिळाली. आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजपचा पराभव होतो, हे चित्र विधानपरिषद निवडणुकीत दिसले. त्याची पुनरावृत्ती आघाडी कायम असल्याने आता विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही झाल्याशिवाय राहणार नाही," असे पाटील म्हणाले.

भावनिकता आणि बंडामुळेच चिंचवडला काटेंचा विजय होईल, असे सांगत त्यांनी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची सहानुभूती त्यांची पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळणार नाही, असा दावा केला. "भावनिकतेची दखल आता घेतली जात नाही, तर शिवसेना बंडखोर राहूल कलाटे यांच्या बंडखोरीचाही फायदा हा आघाडीलाच होईल," असेही ते असे ते म्हणाले.

Pune By-Electon : Jayant Patil
Sanjay Rathod : दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला, पण बंजारा समाजामुळेच पुन्हा मंत्री : राठोडांची प्रतिक्रिया!

काटे यांनी पिंपरी-चिंचवडचे ग्रामदैवत मोरया गोसावीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. यावेळी पाटील, राष्ट्रवादीचे चिंचवडचे निरीक्षक आणि पक्षाचे मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, चिंचवडचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com