
Pune By-Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड (Pune Bypoll Election) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष ठेवले जात आहे. यासंबंधी आचारसंहिता कक्षाने यावर कडक कारवाईचा धडाकाच लगावला आहे. या कक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या 275 पोस्टर, 174 बॅनर्स, 3 हजार 724 झेंडे आणि विविध होर्डिंग्स व फलका हटवून, कारवाई केली गेली आहे.
आचारसंहितेचा कोणाकडून उल्लंघन होणार नाही, यासाठी विविध पथकांकडून मतदारसंघातल्या बारिकसारीक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या निर्देशानुसार सर्व पथक प्रमुख व कर्मचाऱ्यांना दिले गेले आहेत. या आदेशानुसार मतदारसंघात लक्ष ठेवले जात आहे.
निवडणुकीतील उमेदवारांच्या सोयीसाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात एक खिडकी कक्ष सुविधा बहाल करण्यात आली आहे. आयोगाच्या सी-व्हिजील ॲपवर आतापर्यंत 12 तक्रारी आले आहेत. तक्रार निवारण कक्षाकडे नोंद होणाऱ्या तक्रारी व हककतींची तातडीने दखल घेतली जाते, व त्यावर कार्यवाहीसुद्धा केली जात आहे.
आतापर्यंत 52 तक्रारींचं निरसन :
आचारसंहिता कक्ष इथेही, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवता येऊ शकतात, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व अधिकारी सचिन इथापे यांनी माध्यमांना दिली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 52 तक्रारींचं सोडवल्या आहेत. परिसरात काही चुकीचे प्रकार सुरु असल्यास,काही आक्षेपार्ह आढळल्यास तक्रार दाखल करण्याचं मतदार, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.