Pune BRT : पोलिसांपाठोपाठ पुणेकरांचाही बीआरटीला कडाडून विरोध!

Pune BRT : वडगाव शेरी नागरीक मंचाच्या पुणेकर नागरीकांडून मागणी करण्यात आलेली आहे.
BRT
BRTSarkarnama

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक सक्षम यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पुणे महानगर पालिकेने बीआरटी योजना राबवण्यास सुरूवात केली. यासाठी पालिकेकडून आजपर्यंत पुणेकरांचे कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. योजना पूर्णत्वास गेली नाही, मात्र काही प्रमाणात, काही मार्गांवर बीआरटी रूट कार्यान्वित आहे. मात्र आता याच मार्गिंकांना विरोध होताना दिसून येत आहे. पुण्यातील वडगाव शेरी नागरीक मंचाने बीआरटी बंद करणाची मागणीवरून आंदोलन केले आहे.

बीआरटी मार्गामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरो जावे लागत आहे. बीआरटी मार्ग बंद करून पुणेकर नागरीकांची वाहतूक मार्गिकेतून सुटका झालीच पाहिजे, असं वडगाव शेरी नागरीक मंचाच्या पुणेकर नागरीकांडून मागणी करण्यात आलेली आहे.

BRT
Supriya Sule : 'जे सत्य तेच दाखवलं पाहिजे : विरोधी सिनेमे खपवून घेतले जाणार नाही'
BRT
Ajit Pawar : अजितदादांनी मौन सोडलं ; सुळेंवर सत्तारांनी केलेल्या विधानाबाबत म्हणाले..

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरातील बीआरटी मार्ग बंद करा, अशा मागणीचं पत्र पुणे पोलीस आयुक्त यांनी महापालिका आयुक्तांना लिहले होते. यापूर्वीच शहराची वाहतूक समस्या अधिकच बिकट बनली आहे. यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी, पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे केली होती.

आता पोलीस आयुक्तांनीच पुणे महापालिकेला पत्र लिहले होते. शहरातील वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा, तसेच अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता पुणेकारांकरांकडून या विरोधात आंदोलन केल्याने बीआरटी बंद करण्याबाबतच्या मागणीला आणखी जोर मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in