पुण्यात भाजपाच्या रासने यांनी केला विक्रम : सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद - In Pune, BJP's Rasne set a record for the third time in a standing comitee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुण्यात भाजपाच्या रासने यांनी केला विक्रम : सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हेमंत रासने यांची निवड आज करण्यात आली.

 

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हेमंत रासने यांची निवड आज करण्यात आली. पुणे महापालिकेच्या इतिहासात सलग तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविणारे रासने पहिले अध्यक्ष ठरले आहेत. या पदाच्या निवडणुकीत भाजपाने रासने यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉग्रेस, शिवसेनेच्या महाविकास आघाडीकडून बंडू गायकवाड रिंगणात होते या निवडणुकीत रासने यांना दहा आणि गायकवाड यांना सहा मते मिळाली.

स्थायी समितीचा कार्यकाळ संपल्याने नव्या सदस्यांसह अध्यक्षांची आज निवड झाली. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तेव्हाचे स्थायी समितीचे अध्यक्ष हे आमदार झाल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि रासने हे अध्यक्ष झाले. त्या कार्यकाळातील केवळ तीन महिने रासने यांनी मिळाले होते त्यामुळे या पदावर गेल्या वर्षी रासने यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर रासने यांची स्थायीचे सदस्य म्हणून दोन वर्षांची मदत संपली, तरीही, महापालिकेच्या आगामी निवडणुका समोर ठेऊन रासने यांनाच पुन्हा स्थायीचे सदस्य करीत, त्यांच्याकडे अध्यक्षपद ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यानुसार त्यांना उमेदवारीही दिली. या पदाच्या निवडणुकीत रासने विजयी झाले असून, त्यांच्याकडे तिसऱ्यांदा हे पद आले आहे.

या संदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना रासने म्हणाले, ‘‘ पक्षाने माझ्यावर मोठ्या विश्‍वासाने जबादारी टाकली असून ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कोरोनासारखे मोठे संकट असतानाही आम्ही सर्वांनी मिळून गेले वर्षभर सक्षमपणे काम केले. नव्या अर्थिक वर्षात योजलेली कामे समर्थपणे मार्गी लावून पुण्याला एक चांगले शहर म्हणून नावारूपाला आण्याचा आमचा प्रयत्न राहील. आकारमानाने पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर ठरले असून देशातही बंगळूरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो.किमान ५० हजार कोटी रूपयांच्या पायाभूत सुविधांच्या कामाची शहराला गरज आहे. या कामातून जागतिक पातळीवरील एक सुंदर आणि सर्व सोयींनी युक्त असे शहर होऊ शकते. हे सारे करण्याच्या दृष्टीने आमची पावले नक्की पडतील. शहरात सध्या सुरू असलेले मेट्रो, जायका प्रकल्प तसेच रस्त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.’’
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख