BJP Pune News: दोन नेत्यांमध्ये जुंपली ; लेटरवॉर सुरु

BJP News: शहराध्यक्षपदाची धुरा मुरलीधर मोहोळ अथवा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे द्यावी, अशी मागणीही केसरकर यांनी तीन दिवसापूर्वी केली आहे.
BJP Pune
BJP Punesarkarnama

BJP News : भारतीय जनता पक्षातील (BJP) अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांना बदला; अन्यथा आगामी महापलिका निवडणूक जिंकणे अवघड होईल, असा इशारा देत माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर (Ujjwal Keskar) यांनी भाजपमध्ये ठिणगी टाकली आहे.

पुणे शहराध्यक्षपदाची धुरा माजी महापौर तथा भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) अथवा आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्याकडे द्यावी, अशी मागणीही केसरकर यांनी तीन दिवसापूर्वी केली आहे. केसरकरांच्या या भूमिकेला पुणे शहराध्यक्ष व प्रवक्ता धनंजय विष्णू जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत जाधव यांनी एक परिपत्रक काढले असून केसरसरांना चांगलेच सुनावले आहे.

माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या एका ट्विटच्या पोस्टने पुण्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली आहे. केसरकर यांनी त्या पोस्टमध्ये थेट शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुळीकांना बदला; अन्यथा महापालिकेची सत्ता विसरा, असा इशाराच दिला आहे.

उज्वलजी, भाजपा पुणे शहरात कोणतेही गटबाजी नाही पण काही अल्पसंतुष्ट लोकं गटबाजी असल्याचे लोकांना भासवतात. भारतीय जनता पार्टीकडे अनेक निवडणूक तज्ज्ञ आहेत आपल्या सारख्या स्वयंघोषित नेता आणि निवडणूक विश्लेषकाची गरज नक्कीच नाही.मुळातच उज्वल केसकर हे भारतीय जनता पार्टीत आहेत की नाही हाच प्रश्न आहे, अशा शब्दात धनंजय जाधव यांनी त्यांना सुनावले आहे.

BJP Pune
School Nutrition Scheme : पोषण आहाराबाबत दीपक केसरकरांनी केली मोठी घोषणा

कोरोनाच्या महामारी मध्ये पुणे शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीने जगदीश मुळीक त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम केलं. खासदार, आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, मंडल अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शहराची संपूर्ण कार्यकारणीने आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर कोरोना साथीत अतिशय चांगलं काम केल्यामुळे नागरिकांना खूप च मदत झाली, असे जाधव यांनी पत्रात म्हटलं आहे.

धनंजय जाधव आपल्या पत्रात म्हणतात..

भारतीय जनता पार्टीचे माजी विरुद्ध पक्ष नेते उज्वल केसकर यांनी मागणी केली की शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांना काढून नवीन नेतृत्वाला संधी द्यावी. भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या नवीन शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष म्हणून जगदीश मुळीक यांचीच नियुक्ती होईल अशी संभावना जास्त आहे.

इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर नसताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, नेता हा लोकांच्या साठी औषधे, जीवनावश्यक वस्तू वाटप करत होता. ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, युवक असो, युवती असो किंवा कोरोना बाधित पेशंट असो या सर्वांना मदत करण्याचं काम शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात होत होत.

भारतीय जनता पार्टीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नव्हे तेवढी विविध जाती धर्माच्या, विविध घटकातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी जगदीश मुळीक यांनी मिळवून दिली.

भारतीय जनता पार्टीच्या शहरात विविध क्षेत्रातल्या आघाड्या करून ७०० ते ८०० पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी करण्यात आली आणि विविध दुर्लक्षित घटकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले.भारतीय जनता पासून पार्टी पासून दुरावलेल्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये आणून त्याचं पुनर्वसन करण्याचं काम त्यांनी केलं.

तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी या युक्ती प्रमाणे पुणे शहर ढवळून काढलं. प्रत्येक मतदार संघाच्या, आघाड्यांच्या बैठकांना अनेक वेळा उपस्थित राहून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले, शहरामध्ये होणारे पक्षाचे आंदोलन असो किंवा पक्षाचा मेळावा असो आपल्या नेतृत्व गुणांमुळे यशस्वी करण्याचे काम त्यांनी केल आहे.

BJP Pune
Lokpal Bill : विधानसभेत मंजूर झालेले लोकायुक्त विधेयक काय आहे?

आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्टीचं पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हा पुणे शहराला मिळाला नव्हता. तो नेता जगदीश मुळीक यांच्या रूपात भारतीय जनता पार्टी ला अध्यक्ष म्हणून लाभला.

प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधून पार्टी वाढवण्याचे काम ते करत आहेत. भारतीय जनता पार्टी चे अद्यावत आणि भव्य पुणे शहर कार्यालय त्यांनी सुरू केलं.

भाजपचा वर्धापन दिन असो किंवा दिवाळी फराळाचा कार्यक्रम असो हजारो लोकांची उपस्तिथी पहिल्यांदा च पाहिली. एवढेच नाही तर शहराच्या नूतन शहर कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी किमान २० हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सत्ताधारी पार्टीचा शहराध्यक्ष या नात्याने पुणे महानगरपालिके मध्ये ढवळाढवळ न करता योग्य ते निर्णय व्हावे, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कटीबद्ध म्हणून महानगरपालिकेमध्ये अधिकारी आणि नगरसेवक नगरसेवकांच्या बैठका येऊन अनेक योजना मार्गी लावण्याचे काम केलं.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारा विरुद्ध अनेक यशस्वी आंदोलने केली. भाजपा माजी केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची गणेश काल क्रीडा येथे लोकसभा बूथ प्रमुखांना मार्गदर्शन सभा यशस्वी केली.

नुकतीच झालेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणूकित सुद्धा पार्टीला चांगले यश मिळाले. पुणे मनपा मध्ये किरीट सोमय्या यांना शिव सेनेच्या कार्यकर्त्या कडून झालेली धक्काबुक्की असो, पार्टीचे प्रवक्ते आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कडून झालेली मारहाण असो या विरुद्ध विरोधकांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे काम शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याच काळात झाले.

पार्टीच्या कार्यकर्त्याने मार खाण्याचे दिवस गेले. आता पार्टीचा कार्यकर्ता मार खाणार नाही म्हणून कार्यकर्त्यांचे समर्थन ही केले. पार्टीच्या सर्व सामान्य, चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकत देण्याचे काम जगदीश मुळीक करत आहेत.

BJP Pune
TET Scam : असा विरोधी पक्ष पाहिला नाही ; फडणवीसांचा अजितदादांना टोला

पुणे लोकसभा निवडणूक अजून खूप लांब आहे, पण वडगाव शेरी तील मुळीक यांच्या सारखा उमेदवार भाजपा कडून लोकसभेला आला तर पुणे शहरातील मोठ्या मतदान तर होईलच पण वडगाव शेरी मतदार संघातून ही मोठे मताधिक्य मिळेल. जगदीश मुळीक यांच्या बाबत पक्षश्रेष्टी चांगला निर्णय घेतीलच.

जगदीश मुळीक यांच्या कामाचा जोर आणि नेतृत्वाचा विचार करता जगदीश मुळीक यांना पुन्हा शहर अध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडू शकते. राहिला विषय येणारी पुणे महानगरपालिका निवडणूक तर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीशभाऊ बापट, खासदार प्रकाश जावडेकर शहरातील सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेउन चालणारे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शंभर पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल हा विश्वास आहे. जगदीश मुळीक शहर अध्यक्ष म्हणून नक्कीच हा विजय संपादन करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in