Pune News: पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पाच उमेदवारांची नावं जाहीर; काँग्रेसला पॅनेलमधून डच्चू

Pune Agricultural Produce Market Committee Election: भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीकडून उमेदवारी...
Pune Agricultural Produce Market Committee Election 2023
Pune Agricultural Produce Market Committee Election 2023 Sarkarnama

Pune : राज्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. नवी मुंबईनंतर सर्वात मोठी असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुमारे १९ वर्षानंतर होत आहे. या निवडणुकीत एकुण १८ संचालकांची निवड होणार आहे. यातील ११ जागा सोसायटी गटातून, चार जागा ग्रामपंचायत गटातून, दोन जागा व्यापारी गटातून तर एक जागा हमाल, तोलणार गटातून निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी साडे सतरा हजार मतदार आहेत. चारशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र अशी रचना करण्यात येणार आहे.

Pune Agricultural Produce Market Committee Election 2023
Ajit Pawar News : नागपूरच्या सभेत अजित पवार बोलले नाहीत, मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांचीच…

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती(Pune Agricultural Produce Market Committee Election) पुणेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनेलकडून १५ पैकी उर्वरित ५ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाला पॅनेलमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

एकूण संचालक मंडळाच्या १८ जागांपैकी व्यापारी-अडते आणि हमाल-तोलणार गटाच्या ३ जागा वगळून विकास सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील १५ जागांवरील उमेदवार जाहीर केले असून शुक्रवारी १० उमेदवार जाहीर केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उर्वरित ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Pune Agricultural Produce Market Committee Election 2023
Karnatak Election 2023: भाजपला दुसरा धक्का; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, काय आहे कारण?

विकास सोसायटी सर्वसाधारण गटातून दत्तात्रेय दिनकर चोरघे (रहाटवडे), कुलदीप गुलाबराव चरवड (वडगाव बुद्रूक), संदीप माणिकराव गोते (बिवरी-गोतेमळा), महिला प्रवर्गातून प्रतिभा महादेव कांचन (उरुळी कांचन), अनुसूचित जमाती गटातून नानासाहेब कोंडिबा आबनावे (बकोरी) यांचा समावेश आहे. रविवारी (दि.१६) सकाळी सर्वसाधारण गटातील 3 आणि महिला प्रवर्गाची 1 जागा व ग्रामपंचायत गटातील 1 जागेवरील मिळून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

भाजपला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीकडून उमेदवारी...

उरुळीकांचन येथील महादेव कांचन यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी (दि.१५)प्रवेश केला आणि रविवारी लगेचच त्यांच्या पत्नी प्रतिभा कांचन यांना महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com