सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांनाच नोटीस देत निषेध!

Ganesh Visarjan : नोटीशीला सात दिवसात पोलिसांनी उत्तर न दिल्यास, न्यायालयात जाण्याचा इशारा.
Ganesh Immerssion Procession
Ganesh Immerssion ProcessionSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सव दणक्यात, कसल्याही निर्बंधाविना साजरा होणार, असे जाहीर केले होते. यामुळे गणेशोत्सव मुंबई, पुण्यासह राज्यभरात मोठ्या दणक्यात साजरा झाला. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत संपलेली नव्हती. मिरवणुकी दरम्यान मोठ-मोठ्या ध्वनीक्षेपाच्या भिंती उभे करून, अनेक गणपती मंडळांनी आवाजाच्या निर्धारित डेसिबल मर्यादा ओलांडून, प्रचंड ध्वनीप्रदूषण केले. मिरवणुकी दरम्यान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवले गेले, असे आक्षेप घेण्यात आले आहेत. सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबाव तंत्रामुळे गणेशोत्सवात अनेक मंडळांनी ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन करूनही त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही. त्याबाबत पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका गटाने सोमवारी पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देत निषेध नोंदविला. तसेच विसर्जन मिरवणुकीतील गैरव्यवस्थापनाबाबत पोलिसांना नोटीस दिली.

पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांना निवेदन व गुलाबपुष्प दिले. यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी, मुकुंद किर्दत, निखिल जोशी, उत्पल व्ही. बी., ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई, ॲड. तृणाल टोणपे आदी यावेळी उपस्थित होते.

Ganesh Immerssion Procession
नितीश कुमारांना पुन्हा झटका : राज्य जेडीयू कार्यकारिणी भाजपमध्ये दाखल

विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला वेळ, ढोल ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे दुर्लक्ष, मिरवणुकीतील कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश, ध्वनीवर्धकांचा वापर, प्रखर प्रकाशझोत अशा अनेक मुद्यांकडे लक्ष वेधणारी नोटीस पोलिसांना देण्यात आली आहे. या नोटीशीला येत्या सात दिवसात पोलिस प्रशासनाने उत्तर न दिल्यास कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पुण्यातल्या या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in