पुरोगामी महाराष्ट्र अंधश्रद्धेचा बळी; राज्य महिला आयोगाची जनतेला साद

Maharashtra| Black Magic| महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत.
Maharashtra| Black Magic|
Maharashtra| Black Magic|

पुणे : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. या घटना घडू नयेत, यासाठी जनतेनेच सतर्क राहायला हवे, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केले आहे.

याचवेळी त्यांनी राज्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांकडेही लक्ष वेधलं आहे. ''काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Maharashtra| Black Magic|
Monsoon Session :'चला, काही तरी मिळालं' ; सभागृहात शिरसाटांना आमदारांचा टोला

धक्कादायक म्हणजे पुण्यातही असा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले. ''पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती , सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावली. या प्रकरणी या पीडितेच्या पती , सासू , सासरे यांना अटक झाली होती आणि आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.

या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे हे माझं मत आहे आणि हे कारण समूळ नष्ट करणे ही तुमची , आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी आहे, अशी साद रुपाली चाकणकर यांनी घातली आहे.

या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्याने विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती ला पण मी अशा मुद्द्यांवर जनजागृती करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com