पृथ्वीराज चव्हाण म्हणाले;राणेंचा मला असा कधी अनुभव नाही  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे असलेला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयासारखा विभाग राणे यांच्याकडे देण्यात आला
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले;राणेंचा मला असा कधी अनुभव नाही  
prithviraj.jpg

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) माझ्या मंत्रीमंडळात होते. मंत्रीमंडळात त्यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी होती. मात्र, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्याबाबत जसे बोलले तसा माझा अनुभव नाही,असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले.(Prithviraj Chavan said; I have never experienced Rane like this)   

‘सरकारनामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना चव्हाण यांनी कृषी कायद्यापासून देश तसेच राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर सविस्तर उत्तरे दिली.गेल्या आठवड्यात कोकण दौऱ्यात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. या संदर्भाने विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘‘ राजकारणात बोलण्याची एक पद्धत असते. त्यामुळे राणे काय बोलले यावर मी बोलणार नाही. मात्र, माझ्या मंत्रीमंडळात राणे उद्योग मंत्री होते. मंत्री म्हणून ते उत्तम काम करीत होते.माझे सहकारी म्हणून काम करताना मला असा अनभुव कधी आला नाही.’’

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना हा सत्तेतला महत्वाचा भागीदार आहे. मात्र, काही काळानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडून भाजपासोबत येईल, अशी अपेक्षा भाजपा नेत्यांना वाटत होती.मात्र, ही अपेक्षा फोल ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने राणे यांना मंत्रीमंडळात घेऊन महत्व दिल्याचे दिसत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपाचे मोठे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे असलेला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयासारखा विभाग राणे यांच्याकडे देण्यात आला असून यावरून त्यांना भाजपाने दिलेले महत्व लक्षात येते, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.  

उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील धार कायम ठेवणारे अशी राणे कुटुंबाची ओळख आहे. या मंत्रीपदामुळे ही धार आणखी तीव्र होईल, असा अंदाज राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.