कारागृह अधिक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून

Pune Crime news| Murder| मंगळवारी रात्री गिरीधरच्या मोबाईलवर एक फोन आला.
कारागृह अधिक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून
Crime news puneSarkarnama

Pune Crime news marathi

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता अमरावतीच्या (Amaravati) तरुणाची पुण्यात हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गिरीधर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news pune
'तर ब्रिजभूषण सिंह'ची तंगडी तोडल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाही': मनसेचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीधर हा अमरावती कारागृहाचे अधिक्षक उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा आहे. या प्रकरणी मृत गिरीधरचा भाऊ निखिल कुमार गायकवाड यांच्या फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री गिरीधरच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन ठेवल्यानंतर तो घाईघाईने घरातून बाहेर पडला, गिरीधर घरातून बाहेर पडताना निखिल यांनी कोणाचा फोन आहे, कुठे चाललास असल्याचे विचारले. त्यावर त्यांनी फक्त जाऊन येतो म्हणून उत्तर देत तो निघून गेला. गिरीधर बराच वेळ होऊनही घरी न आल्याने निखिलने पुन्हा फोन लावला. तेव्हा एकदा रिंग वाजली आणि नंतर फोन नॉट रिचेबल लागला.

काही मिनिटांनी उत्तरेश्वर गायकवाड यांचा फोन आला. ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात गिरीधर याचा खून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर निखिल घटनास्थळी पोहचले असता तिथे गिरीधर याचा मृतदेह आढळला. तर गिरीधरवर कोयत्याने सपासप वार करुन हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या प्रकरणी चार पुरुष आणि तरुणीवर गुन्हा दाखल झाला असून प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in