पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज: दोन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

PM Narendra Modi News| देहू येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज पुण्यात येत आहेत.
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज: दोन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
PM Narendra Modi News, PM Modi Dehu Visit, Pune News

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (14 जून) पुण्यातील देहू येथे येणार आहेत. देहू येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज पुण्यात येत आहेत. दुपारी दीड ते तीन यावेळेत ते पंतप्रधान देहूत असतील. त्यानंतर लोकार्पण सोहळ्यानंतर माळवाडी येथे त्यांची संवाद सभा होईल. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी देहू सज्ज झाली आहे. (PM Narendra Modi Pune Visit)

विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांचा दौरा असल्याने देहूत कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. देहूला एक प्रकारे छावणीचंच स्वरुप आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देहूतील वाहतुक मार्गातही बदल करण्यात आले आहे.

PM Narendra Modi News, PM Modi Dehu Visit, Pune News
विधवा नव्हे एकल महिला असे म्हणू या!

मुख्य देऊळवाड्याला फुलांची सजावट करण्यात आली आहे. चारशे वारकरी मुख्य मंदिरात पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी मिळाल्याने येथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. केवळ मंदीर परिसरातच नव्हे तर संंपूर्ण देहूवासियांमध्ये उत्साह संचारला आहे.

देहू येथील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान माळवाडी येथे संवाद सभा होणार आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने सभास्थळी पर्स, बॅग, रिमोट चावी, पाणी बाटली, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पॉवर बँक आदी वस्तू नेण्यास परवानगी नाही. पंतप्रधानांसाठी रंगीत तालीम झेंडेमळा येथे हेलिपॅड केले करण्यात आले असून तेथून कारने देहूतील मुख्य मंदिरात जातील. लोकार्पण कार्यक्रमानंतर सभास्थळी रवाना होतील. (PM Modi Dehu Visit)

PM Narendra Modi News, PM Modi Dehu Visit, Pune News
आदित्य ठाकरेंच्या आधीच नाशिकचे शिवससैनिक अयोध्येत दाखल

असे आहे शिळा मंदिर

तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर नदीकाठच्या दगडी शिळेवर बसून त्यांनी १३ दिवस अनुष्ठान केले. आता ही शिळा मुख्य देऊळवाड्यात आहे. या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला दोन सुवर्ण कळस असून मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस उभारण्यात आले आहेत. तसेच तुकाराम महाराजांची नवीन मूर्ती बनविण्यात आली आहे.

असा असेल दौरा

दुपारी 1.15- पुणे विमानतळावरून देहू हेलिपॅडकडे प्रयाण

1.35 - देहू हेलिपॅड येथे आगमन

1.40 - श्री संत तुकाराम महाराज मंदिराकडे मोटारीने प्रयाण

1.45 - मंदिर लोकार्पण व संवाद सभा

3.05 - हेलिपॅडकडे प्रयाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in