मोदींनी आमंत्रण स्वीकारले! देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच येणार देहूत

भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) १४ जून रोजी येणार देहूत येणार आहेत. भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानच्या विश्वस्तांना घेऊन तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांना देहूमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. ते आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारले असून १४ जूनला ते देहूमध्ये येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

Narendra Modi
राजनाथ सिंहांनी दिले गडकरींच्या नातवाला आशीर्वाद

महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमीपूजन करुन वारकरी संप्रदायाला भव्य-दिव्य भेट दिल्याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळासह दिल्ली येथे तुषार भोसले यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती.

Narendra Modi
संभाजीराजे-सेना नवा ट्विस्ट : दुपारी बारापर्यंत `शिवबंधन` बांधण्याची मुदत; अन्यथा...

दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी एक महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी राज्यात आले होते. त्यानंतर ते आता १४ जूनला येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com