पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ प्रदेश भाजपा घरा-घरात पोचवणार

भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्याकडे या विशेष मोहिमची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Prime minister Narendra Modi

Prime minister Narendra Modi

Sarkarnama

पुणे : मुंबईसह राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर प्रदेश भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ च्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार राज्यातल्या घरा-घरांपर्यंत पोचविण्यासाठी प्रदेश भाजप (BJP) विशेष मोहीम राबविणार आहे.

<div class="paragraphs"><p>Prime minister Narendra Modi</p></div>
भाजपचे आमदार जयकुमार गोरे म्हणतात, ‘मी अजितदादांचा फॅन’

भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्याकडे या विशेष मोहिमची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.३० जानेवारीपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील ७५ हजार बूथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून जनतेबद्दल केलेल्या भावना या मोहिमेतून पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्या बैठक होणार असून तातडीने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Prime minister Narendra Modi</p></div>
गडकरींनी मानले न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांचे आभार

राज्यात महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत संभ्रम आहे.राज्य सरकारने नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र, भारतीय जनता पार्टीची तयारी निवडणुका होणार आहेत या पद्धतीने सुरू आहे.निवडणुका कधीही झाल्या तरी तयारी कायम राहावी यासाठी प्रदेश भाजपाने सर्व पातळ्यांवर कामाला सुरूवात केली आहे.

राज्यातील प्रमुख महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे एका अर्थाने मिनी विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपाने सर्व पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे.या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे.या निवडणुकीत काहीही करून शिवसेनेला मात द्यायचीच अशी तयारी भाजपाच्यावतीने कण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचे वाढत असलेले रूग्ण ही गंभीर बाब आहे. त्यामुळे निवडणुका अधांतरीच आहेत.येत्या दोन महिन्यात कोरोनाचे रूग्ण वाढण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.त्यामुळे निवडणुकांचे काय होणार याची काळजी सर्वच राजकीय पक्षांना लागून राहिली आहे.मात्र, निवडणुका झाल्याच तर तयारी असावी या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीच्यावतीने तयारी करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com