पंतप्रधान मोदी म्हणाले; ‘मन की बात’ ही तर विचारयात्रा

गेल्या वर्षी २२ मार्चला भारतीयांनी जनता कर्फ्यू हा शब्द पहिल्यांदा अनुभवला.
modi1
modi1

पुणे : गेल्या वर्षी २२ मार्चला भारतीयांनी जनता कर्फ्यू हा शब्द पहिल्यांदा अनुभवला. या काळात भारतीयांनी शिस्तीचे दर्शन घडविले. वर्षभर कोरोना योद्धयांनी आपले काम निष्ठापूर्वक केले.अजूनही त्यांचे काम सुरूच आहे. कोरोनातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी ‘दवाई भी और कढाई भी’ हा मंत्र लक्षात ठेवायला हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. देशाला उद्देशून केलेल्या ७५ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात हा कार्यक्रम ऐकणाऱ्या देशभरातील श्रोत्यांचे कौतुक करीत ‘मन की बात’ ही एक विचारयात्रा असल्याने सांगितले.


या विचारयात्रेच्या माध्यमातून मला स्वत:ला खूप काही शिकता आहे. देशातल्या विविध भागातील बंधु-भगिनींशी संवाद साधता आला. ७५ भागांच्या या कार्यक्रमात देशातल्या विविध घटकांशी संवाद साधता आला. ३५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीबरोबरच शेती, मधमाशा पालन, स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष, महिला क्रिकेटपटू मिताली राज, आंबेडकर जयंती यासह विविध विषयांना हात घातला. मोदी म्हणाले, ‘‘आपला खूप वेळ वाया गेला आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात खूप काम करण्याची गरज आहे. मधमाशा पालनाचे ओरिसातील शेतकऱ्याचे उदाहरण देत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मधमाशा पालनातून चांगला व्यवसाय होऊ शकतो.’’

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहेत. त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आणखी २५ वर्षांनी स्वातंत्र्याचा शतक महोतसव साजरा करताना यशाची नवी शिखरे गाठायला हवीत. त्यासाठी नवे संकल्प, नव्या कल्पना आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवापाड कष्ट करून समाज आणि देशाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने झटायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. मिताली राज या महिला क्रिकेटपटूचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय क्रिकेटपटू तसेच एकदिवसीय सामन्यात सात हजार धावा करणाऱ्या जगातील पहिल्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत, या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com