prakash ambedkar says sharad pawar should disclose documents related to elgar parishad | Sarkarnama

एल्गारप्रकरणी शरद पवारांनीच करावा मोदी सरकारचा पर्दाफाश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असल्याची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मोदी सरकारचा पर्दाफाश करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पुणे : एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून, त्याबद्दलचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवार यांनी सार्वजनिक करावीत आणि केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबतोय, हे या कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी ही कागदपत्रे सार्वजनिक करावीत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

याबाबत ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान, केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस), भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्र सरकारने राजकारण केले असून, या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे याठिकाणी लावण्यात आले. 

हे प्रकरण सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : कांदा निर्यातबंदी शेतकऱ्यांना उध्दवस्त करणारी : उदयनराजे भोसले
सातारा : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी सूचना साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असताना केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला कांदा निर्यातबंदीचा दिलेल्या प्रस्तावावर उदयराजेंनी समाज माध्यमातून आपली  प्रतिक्रिया व्यक्त करून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख