अशोक पवारांच्या हृदयात कंदांच्या विजयाचा काटा : विधानसभेला आव्हानाची शक्यता

जिल्हा बॅंकेत पोचल्याच्या पवारांच्या आनंदावर कंद यांच्या विजयामुळे विरजण पडले आहे
ashok pawar-pradip kand

ashok pawar-pradip kand

sarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीपासून शिरूर-हवेलीवर आपले एकहाती राजकीय वर्चस्व राखणाऱ्या आमदार अशोक पवारांनी ठरवल्याप्रमाणे पुणे जिल्हा बॅंकेत संचालक-आमदारांच्या पंक्तीत स्थान पटकावले. मात्र त्यांच्या या आनंदात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या विजयाने मिठाचा खडा पडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिरुर-हवेलीच्या राजकारणात कंद आता आणखी ताकदीने सक्रीय होणार, हे नक्की. आमदार पवारांचा एकीकडे जिल्हा बॅंकेत प्रवेश झाला असला तरी त्याच बॅंकेत कंदही पोचल्याने पवारांच्या उरात कंद यांच्या विजयाचा काटा रूतत राहणार, हे मात्र नक्की. (Pradip Kand warns MLA Ashok Pawar after victory in District Bank)

विधानसभेतील ४१ हजार मताधिक्यांच्या विजयापासून आमदार पवारांचा राजकीय वारू शिरूर हवेलीत वेगाने दौडत आहे. माजी आमदार बाबुराव पाचर्णे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीपासून राजकीय विजनवसात गेले होते, ते प्रकटले थेट जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत. त्यामुळे पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकणारे नेतृत्व शिरुर-हवेलीत नसल्याचेही विधानसभा निकालानंतरचे चित्र होते. त्यातच प्रदीप कंद यांचा भाजपप्रवेश २०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी झाला आणि पाचर्णे ४१ हजारांच्या फरकाने हरल्याने कंदांची राजकीय ताकद नसल्याचा मेसेज जसा मतदार संघात गेला, तसाच तो स्वत: कंद यांचा विश्वास घालवण्यापर्यंत गेला की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. कारण, कंद कायम मौनात राहात होते.

ashok pawar-pradip kand

पाचर्णेंची भविष्यवाणी चुकली : पाठिंबा दिलेल्या गव्हाणेंचा दणकून पराभव

अचानक जिल्हा बॅंकेच्या राजकारणात कंद भाजपकडून थेट उतरले आणि स्वत:ची राजकीय कारकीर्दच त्यांनी पणाला लावली. परिणाम असा झाला की, कंद जिंकले तरच ते आगामी विधानसभेसाठी भाजपकडून प्रोजेक्ट केले जाऊ शकतात; अन्यथा कंदांनी सरळ-सरळ घरी बसावे, अशी चर्चा शिरूर-हवेलीच्या राजकारणात होती. मात्र, कंदांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जी प्रचाराला सुरूवात केली, ती संपूर्ण जिल्हा पिंजून काढूनच थांबवली. पण, अस्तित्वाच्या लढाईत कंदांनी बाजी मारली आणि त्यांनी जिल्हा बॅंकेत भाजपचे संचालक म्हणून एन्ट्री केली.

ashok pawar-pradip kand

दिगंबर दुर्गाडेंचा मोठा विजय; दादापाटील फराटेंसाठी जिल्हा बँकेचे स्वप्न अधुरे...

या विजयामुळे कंदांनी स्वत:ला सिध्द करुन दाखविले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिरुर-हवेलीतून आपण उमेदवार म्हणून सज्ज असल्याचेही त्यांनी भाजपच्या श्रेष्ठींना दाखवून दिले आहे. अर्थात, विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकलेल्या अशोक पवारांच्या विरोधात आता कुणीच टिकणार नाही हा मतदार संघातील समज या कंद यांच्या या विजयाने काहीसा पुसट केला आहे. कारण निवडणुका या सुनियोजनाने जिंकता येतात, हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात कंदांनी दाखवून दिले आहे. ते आता शिरूर-हवेलीतही दाखवू शकतो, हा विश्वास भाजपला कंदांनी मिळवून दिला आहे.

ashok pawar-pradip kand

अजितदादांच्या जिव्हारी लागणार पराभव : जिल्हा बॅंकेत भाजपचे प्रदीप कंद विजयी

दुसऱ्या बाजूला भाजपकडे आता उमेदवारच नाही हा राष्ट्रवादीकडून केला जाणारा दावाही कंदांच्या विजयाने पुसट होणार आहे. कारण, अशोक पवार जिथे एकहाती जिल्हा बॅंकेत पोचलेत त्याच जिल्हा बॅंकेत आता कंदही पोचलेले आहे. एकंदरीत अशोक पवार विजयी झाले असले तरी कंदांच्या विजयाने त्यांच्या उरात कंदांच्या विजयाचा काटा रुतत राहणार आहे.

ashok pawar-pradip kand

पुणे जिल्हा बँक : अशोक पवारांचा एकहाती विजय; सातवे आमदार संचालक

जिल्हा नडला; पण दादा नाही पडला...!

प्रदीप कंद यांच्याकडे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर कुठलेच राजकीय पद नसल्याने त्यांचे समर्थक हैराण होते. त्यातच कंद यांच्या भाजपप्रवेशानंतर शिरुर-हवेलीची जागाही गेल्याने कंद समर्थकांची मोठी कोंडी झाली होती. आजच्या विजयानंतर मात्र कंद समर्थकांमध्ये सोशल मीडियात एकच घोषणा जोरात चालली ती म्हणजे ‘जिल्हा नडला; पण दादा नाही पडला...!’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com