
DRDO director Pradeep Kurulkar : पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती देण्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने कुरुलकर यांना अटक केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुणे सत्र कोर्टाने १५ मे पर्यंत एटीएस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
एटीएस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती देण्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने कुरुलकर यांना अटक केली. सुनावणीनंतर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी कुरुलकर यांना 15 मे पर्यंत एटीएस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड अॅनलिसिस विंग- रॉ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली ती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. कुरुलकर यांचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून. जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सध्या फॉरेन्सिक लॅबमध्ये सुरू आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या मोबाइल आणि अन्य उपकरणातून डिलीट झालेला मजकूर फॉरेन्सिककडून मिळाला आहे. या पुराव्याचे विश्लेषण करण्याचे बाकी आहे. कुरुलकर हे सहा देशात शासकीय कामासाठी गेले होते. ते तिथे कोणा कोणाला भेटले, त्यांना डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये भेटायला आलेल्या महिला कोण, याचा तपास होणार आहे, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासात अन्या काही व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यांचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
Edited by: Rashmi Mane
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.