तृप्ती देसाई करणार 'त्या' कीर्तनकाराचा भांडाफोड ; अश्लील व्हिडिओ व्हायरल

तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतयं.
Trupti Desai
Trupti Desaisarkarnama

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) या एका प्रसिद्ध कीर्तनकारांचा भांडाफोड करणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हा कीर्तनकार कोण, त्याचे नाव उद्या समजणार आहे, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. ''कीर्तनकारांच्या लोक पाया पडतात आणि तेच जर असा निर्लज्जपणा करत असतील तर आवाज तर उठवलाच पाहिजे,'' असे देसाई यांनी म्हटलं आहे.

तृप्ती देसाई यांनी याबाबत एक फेसबूक पोस्ट केली आहे. देसाई यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'अशा विकृत प्रवृत्तीवर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि समाजाने देखील यांना धडा शिकवला पाहिजे.. वारकरी संप्रदायाने अशा घातक प्रवृत्तीवर आळा घातला पाहिजे,'' अशी प्रतिक्रिया मयुर पाटील याने फेसबुकवर दिली आहे.

Trupti Desai
नार्वेकरांनी परबांना रोखलं ; हातातील माइक काढून घेतला, अन्..

''एका प्रतिष्ठित कीर्तनकाराचे कीर्तनकार महिलेबरोबर संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून ते मला प्राप्त झाले आहेत, कीर्तनकारांच्या नावासहीत उद्या कारवाईची मागणी करणार आहे,'' असे तृप्ती देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत. महिलांच्या मंदिर प्रवेशबंदी विरोधात त्यांनी शबरीमला येथे जाऊन आंदोलन केले होते. तसेच कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या महिलाविषयक वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेतल्याने सुद्धा त्या चर्चेत आल्या होत्या.

Trupti Desai
शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा ; मनसेनं डिवचलं

ही व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानं आता कीर्तनकारांच्या नावालाच गालबोट लागल्याची चर्चा आहे, यावर कारवाई करावी, अशीही मागणी आता अनेक जण करीत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत.

या महाराजानेच हा व्हिडीओ बनवल्याचं या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतयं. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही कीर्तनकार हे मराठवाड्यातील असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com