Pimpri Police Threat To Kolhe : ‘शिवपुत्र संभाजी’चा प्रयोगच कसा होतो, ते पाहतो? : फुकटचे पास न दिल्याने पोलिसाची खासदार कोल्हेंना धमकी

प्रयोगादरम्यान त्याची माहिती स्टेजवर येऊन त्यांनी देताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. या प्रकारावर त्यांनी खंत व्यक्त केली.
Shivputra Sambhaji
Shivputra Sambhaji Sarkarnama

पिंपरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे या हंगामातील शेवटचे प्रयोग सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये ११ मे पासून सुरु आहेत. परवा त्याची सांगता होणार आहे. मात्र, त्याला शनिवारी (ता. १३ मे) पिंपरीत गालबोट लागले. (Police threatened MP Dr Amol Kolhe for not giving free pass)

या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाहीत; म्हणून हा प्रयोग कसा होतो, तेच पाहतो अशी धमकी एका पोलिसाने डॉ. खासदार कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांना शनिवारी दिली. प्रयोगादरम्यान त्याची माहिती स्टेजवर येऊन त्यांनी देताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. या प्रकारावर त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच, त्याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य दखल घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळे सबंधित पोलिसांवर गृहमंत्र्यांअगोदरच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे हेच कडक कारवाई करण्याची शक्यता आहे.

Shivputra Sambhaji
Kishor Aware Murder Case Update : नगरसेवक वडिलांच्या थोबाडीत मारल्याने मुलाने सुपारी देऊन केला किशोर आवारेंचा खून

पिंपरी पोलिसांचा (Pipmri Police) हा दुखद अनुभव सांगताना त्याचवेळी खासदार कोल्हे यांनी यापूर्वी संभाजीनगर, कोल्हापूर, निपाणी, नाशिक या ठिकाणी जेव्हा हे प्रयोग झाले, त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले होते, हेही आवर्जून सांगितले. नाशिकमध्ये तर पोलिस आयुक्तांनी अडीच हजार पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला. त्याची तुलना करता पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचा अतिशय खेदजनक अनुभव आला, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Shivputra Sambhaji
Karnataka Election Result : एकही दिवस प्रचार न करता...मतदारसंघात न जाताही मिळविला काँग्रेस उमेदवाराने विजय

शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाहीत; म्हणून हा प्रयोग कसा होतो, हेच पाहतो, अशी धमकी एका पोलिसाने खासदार कोल्हेंना दिली. तरीही त्यावर संयम दाखवित माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशा प्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे, असेही कोल्हे म्हणाले.

Shivputra Sambhaji
Karnataka Result : कर्नाटकच्या निकालाने वाढविले शिवसेना-भाजप नेत्यांचे टेन्शन

हे सांगताना कोल्हे यांनी संबंधित पोलिसाचे नाव मात्र केले नाही. नागरिक जो कर भरतात, त्यातून पोलिसांचा पगार होतो. असे असताना छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी भीख मागता हे पोलिसांच्या उज्वल परंपरेला गालबोट लावणारे आहे. मुंबईवरील 26/11 च्या वेळी घडलेला हल्ला, तसेच कोविडच्या काळात पोलिसांनी प्राणांची पर्वा न करता कामगिरी बजावली होती. या उज्ज्वल परंपरेला शिल्लक स्वार्थापायी गालबोट लावणे योग्य नसल्याचे कोल्हे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com