Maharashtra Police Bharti : पोलिस भरती प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी केले 'हे' आवाहन

Maharashtra Police Bharti : 'विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये..'
 police recruitment
police recruitment Sarkarnama

Maharashtra Police Bharti : राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

पुणे शहरातील पोलिस कर्मचारी आणि चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मंगळवार (ता.३) पासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

पोलिस विभागातील वाहन चालकांची भरती प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पोलिस कर्मचारी संवर्गाची भरती प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरु होईल. ही भरती प्रक्रिया पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या देखरेखीखाली पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे.

 police recruitment
Thane News : भाजप-शिंदे गट-मनसेत रंगला कलगीतुरा : 'दिव्याचं सिंगापूर नव्हे वासेपूर झालंय!'

त्यामुळे भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये, कोणी व्यक्ती भरतीबाबत आमिष दाखवत असल्यास अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये, तसेच, संबंधित व्यक्तींबाबत दक्षता अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

 police recruitment
Maharashtra Politics : भाजपने वाढवले अमोल कोल्हे अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे टेन्शन

सर्व उमेदवारांनी त्यांना MAHA-IT यांच्याकडून ऑनलाईन दिलेल्या प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन करुन दिलेल्या तारखेस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे. उमेदवारांना देण्यात आलेल्या तारखेस उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास कोणत्याही परिस्थितीत तारीख बदलून दिली जाणार नाही.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी येताना अर्जाची आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची छायांकित/साक्षांकीत प्रतींचे २ सेट (संच) सोबत ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in