पुण्यात मुळशी पॅटर्नची झलक; थेट कोयत्याने कापला केक...

Pune Police|Crime : वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या या ४ गाव गुंड मुलांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात मुळशी पॅटर्नची झलक; थेट कोयत्याने कापला केक...
Crime newsSarkarnama

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नची झलक पहायला मिळाली आहे. मुंढवा परीसरात भर रस्त्यात गाड्या उभ्या करून, हातात कोयते नाचवत गाव गुंड स्वतःचा वाढदिवस (Birthday) साजरा करत स्थानिक नागरिकात दहशत निर्माण करत आहेत. वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या या ४ गाव गुंड मुलांना मुंढवा पोलिसांनी (Pune police) अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या गाव गुंड मुलांचे साधारण वय १८ ते २१ वर्ष आहे.

Crime news
भाजपच्या पोलखोल अभियान रथावर दगडफेक; लाड म्हणाले हिंमत असेल तर समोर या...

वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नानागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या गाव गुंड मुलांची नावे आहेत. एकेकाळी शांत, सुसंस्कृत पुणे म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आजघडीला अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळ्या कार्यरत झाल्या असून शहराचे वातावरण खराब केले जात आहे. रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचे चित्रण आपल्याला 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात पाहायला मिळालं होते, मात्र, पुण्यात या टोळ्या दिसत असल्याने मोठ्याप्रमाणात याची चर्चा होत आहे.

Crime news
गंभीर गुन्हे सोडून पिंपरी पोलिसांनी पकडला नऊ ग्रॅम गांजा अन् आणि दोन चिलीम...

आयटी क्षेत्राच्या उद्यानंतर पुण्याचा चेहरा-मोहरा बदलू लागला होता. पुण्याच्या भोवतालच्या गावच्या जमिनीस भाव येऊ लागले. त्यातूनच जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटचीही संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधी-कधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातूनच गुंडगिरीला चालना मिळाली आणि असे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात रस्त्यावर अश्याप्रकारे आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या या मुलांचे वय बघता या वयातील मुलांना गुन्हेगापासून रोखणे हे पोलिसांपुढील एक मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.