नितेश राणेंनी आरोप केलेला 'तो' माजी नगराध्यक्ष एकवीस दिवसानंतर पोलिसांना सापडला...

पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक केली आहे.
Crime News
Crime News Sarkarnama

दौंड : दौंड शहरात तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला व तरूणांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी तथा दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याला पोलिसांनी राजस्थान मधून ताब्यात घेतले आहे.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आठ दिवसांपूर्वी बादशहा शेख याचा ठावठिकाणा मिळाला असून पोलिस त्यालाही पकडतील, असा विश्वास व्यक्त केला होता. (Crime News)

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी या बाबत माहिती दिली. संशयित आरोपी बादशहा आदम शेख व त्याचा सहकारी रमजान (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या दोघांना अजमेर (राजस्थान) येथून २९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.

Crime News
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ठाकरेंची फिल्डिंग; भाजप आमदाराच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी

दौंड शहरात २० ऑक्टोबर रोजी विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या तरूणी व तिच्या कुटुंबातील सात सदस्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. पीडितेच्या फिर्यादीनुसार माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख याच्यासह एकूण २० जणांविरूध्द ९ नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी १७ नोव्हेंबर रोजी बादशहा शेख याच्या अटकेच्या मागणीसाठी दौंड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. राणे यांनी या प्रकरणातील शंशयित आरोपी व काही पोलिस अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा जाहीर आरोप केल्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

Crime News
Tukaram Munde : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे पाहणार शिर्डी साई संस्थानचा कारभार

बारामती येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी बादशहा शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, बादशहा शेख याने सलग २९ वर्षे नगरसेवक, दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ५ वर्षे गटनेता, दौंड बाजार समिती स्वीकृत संचालक आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com