पुण्यात माजी मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल - Police FIR against ex minister Balasaheb Shivarkar | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात माजी मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 9 मे 2021

सूनेच्या छळाची तक्रार

पुणे :  काँग्रेसचे नेते,  माजी मंत्री बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत विठ्ठलराव शिवरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवरकर यांची सून स्नेहा अभिजित शिवरकर (वय 37) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR registerd agaisnt Ex Minister Balasaheb Shivarkar)

या प्रकरणी पती अभिजित शिवरकर (वय 38), सासरे बाळासाहेब शिवरकर (वय 69) सासू कविता बाळसाहेब शिवरकर (वय 66) आणि सोनाली सिद्धार्थ परदेशी (वय 40) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित हे माजी नगरसेवक आहेत. भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 अन्वये फिर्याद देण्यात आली आहे. मानसिक आणि शारीरिक छळ करत मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वानवडी पोलिसांत (wanwori police) या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

वाचा ही बातमी : जमीन लाटण्याचा प्रयत्न फसल्याने भाजप नेत्यांचे अजितदादांवर आऱोप

मुख्यमंत्री घरात, अजितदादा पुण्यात, गडकरींनी विदर्भाला सांभाळले....

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख