
Pune Crime News : पुणे शहरात फोफावत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याचा दंडुका उगारला आहे. पुण्यातील व्यावसायिकांना लुबाडणाऱ्या टोळीवर पोलिसांनी थेट मोका अतर्गंत कारवाई केली आहे.
पुणे शहराच्या मार्केटयार्ड परिसरातील दोन व्यावसायिकांना पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल २८ लाख रुपये लुबाडणाऱ्या टोळीतील १३ जणांवर पोलिसांनी थेट मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. रितेश कुमार यांनी पदभार घेतल्यापासून 'मोका'ची ही पाचवी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचा प्रमुख अविनाश रामप्रताप गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी १२ नोव्हेंबरला मार्केटयार्ड परिसरात दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवून २८ लाख रुपये आणि मोबाईल लुबाडून नेले होते. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून या टोळीतील १३ जणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला.
दरम्यान, पोलिसांनी आता सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर ‘मोका’ कायद्यान्वे कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली आहे. मात्र शहराच्या काही भागांमध्ये अद्यापही कोयते - हत्याऱ्यांच्या धाक दाखवत दहशत निर्माण करण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी पोलीस अजून काय पावलं उचलणार? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वैदगौरव सोसायटी, शिवणे), आदित्य अशोक मारणे (वय २८, रा. दत्तनगर, वारजे माळवाडी), अजय बापू दिवटे (वय २३, रा. रामनगर, वारजे), नीलेश बाळू गोठे (वय २०, रा. मंगळवार पेठ), विशाल सतीश कसबे (वय २०, रा. मंगळवार पेठ), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय १९ वर्षे, रा. राहुलनगर शिवणे), गुरुजनसिंग सेवासिंग विरग (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), संतोष बाळू पवार (वय २३, रा. खानापूर, हवेली), साई राजेंद्र कुंभार (वय १९, रा. खानापूर, ता. हवेली) यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. त्यांच्यावर लोकांना धमकी देवून लुबाडणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्रे बाळगणे, दरोडा असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.