पुणे-पिंपरीत मनसेच्या चिखले, संभूसांसह अनेक पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

मनसेचा भोंगा सुरु होण्यापूर्वीच बंद!
पुणे-पिंपरीत मनसेच्या चिखले, संभूसांसह अनेक पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
MNS Pune And Pimpri Chinchwad Sarkarnama

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना आजपासून मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून सर्व मशिदींबाहेर आणि त्यातही संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Raj Thackeray latest News)

याशिवाय पोलिसांकडून मनसेच्या राज्यभरातील जवळपास १८ हजार कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना खबरदारी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्येही मनसेचे भोंगे चालू होण्यापूर्वीच पोलिसांनी बंद केले आहेत. पोलिसांनी मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

MNS Pune And Pimpri Chinchwad
राहुल गांधीचा हार्दिक पटेलांना 'खास' मेसेज; पण नाराजी दूर होणार का?

पिंपरी-चिंचवड `मनसे`ने भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्यासाठी तयारी केली होती. शहर पक्ष कार्यालयात सात भोंगे आणूनही ठेवले होते. ते सकाळी भोंगा वाजणाऱ्या मशिदीसमोर लावण्यात येणार होते. पण, त्यापूर्वीच शहर पोलिसांनी `मनसे`शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पक्षाच्या ४० हुन अधिक पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. चिखले यांना त्यांच्या निगडी गावठाण घरातून ताब्यात घेण्यात आले. यावेळी चिखले यांनी पोलिसांनी कोणताही विरोध न करता गाडीत जावून बसणे पसंद केले. त्यामुळे भोंगे लावण्याचा `मनसे`चा बेत पोलिसांनी पिंपरीत तरी हाणून पाडला.

MNS Pune And Pimpri Chinchwad
बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

पिंपरी चिंचवडसह पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. महाआरती करण्यापूर्वीच पोलिसांनी संभूस यांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय अजय शिंदे, विजय तनपुरे, बाळा शेडगे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बोलताना पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, शहरात दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. ज्यांना नोटीस देण्याची गरज आहे त्यांना नोटीस दिली आहे. याशिवाय शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.