‘पीएमआरडीए’च्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीची बाजी : भाजपला दोन जागा

शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत एकहाती विजय मिळवून सर्वांनाच चकीत केले आहे.
NCP-BJP
NCP-BJPSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतील सरपंच आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या मतांवर निर्धारित असलेल्या पीएमआरडीए सदस्यांच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकत बाजी मारली, तर भाजपने दोन जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेला मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही. शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत एकहाती विजय मिळवून सर्वांनाच चकीत केले आहे. (PMRDA election : NCP won four seats, while BJP won two seats in district )

दरम्यान, पिंपरी चिंचवड आणि पुण्यात मात्र अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली आहे. पुण्यात भाजपचे १४, तर पिंपरी चिंचवडमध्ये सहा जागा जिंकल्या आहे. राष्ट्रवादीला पुण्यात सात आणि पिंपरीत तीन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला पुण्यातील एका जागेवर विजय मिळविता आला आहे.

NCP-BJP
गावोगावी लागले धनंजय महाडिक यांच्या आभाराचे फलक!

सन १९९५ मध्ये स्थापन झालेल्या पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) सदस्य निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांतील ८१४ गावांतील ५८१ मतदार या निवडणुकीत एकुण ७ सदस्य निवडून देणार होते. पसंती प्राधान्यक्रमाने मतदान प्रक्रिया असलेल्या या निवडणुकीत एकुण २१ उमेदवार उतरले होते. त्यात राष्ट्रवादीकडून ७, भाजपचे ४, शिवसेनेच्या वतीने २ आणि कॉंग्रेस-२ असे पक्षीय १५ उमेदवारांसह सहा अपक्षांचाही समावेश होता. यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ४ उमेदवार विजयी झाले, तर त्याखालोखाल भाजपच्या दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे. कॉंग्रेस व शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही.

NCP-BJP
आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा

पक्षनिहाय विजयी उमेदवार कंसात गाव व तालुका पुढीलप्रमाणे ः राष्ट्रवादी- सुखदेव बाळू तापकीर (मुलखेड, पो. घोटावडे, ता. मुळशी), प्रियंका दशरथ पठारे (मांगदरी, ता. वेल्हे), वसंत सुदाम भसे (सांगुर्डी, ता. खेड), दीपाली दीपक हुलावळे (कार्ला, ता. मावळ). भाजप : स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे (मांजरी खुर्द, ता. हवेली), कुलदीप गोविंद बोडके (गहुंजे, पो. साळुंब्रे, ता. मावळ), अपक्ष : यशवंत आबासाहेब गव्हाणे (डिंग्रजवाडी, पो. कोरेगाव भीमा, ता. शिरूर).

शिरुरला प्रतिनिधित्व मिळावे म्हणूनच धाडस केले : गव्हाणे

पुणे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा बनविणाऱ्या ‘पीएमआरडीए’सारख्या संस्थेमध्ये शिरुरचा प्रतिनिधी नसणे, हा तालुक्याचा अपमान होता. त्यामुळे मी धाडस केले आणि अपक्ष उभा राहिलो. खरे तर माझे गाव डिंग्रजवाडी. मात्र, कोरेगाव भीमासह तालुक्यातील प्रत्येक गावाने मला पाठबळ दिले. वडील आबासाहेब गव्हाणे यांच्या चाळीस वर्षांच्या निरपेक्ष राजकारणाचा मला मोठा लाभ झाला. आता पीएमआरडीएचा लाभ तालुक्याला कमाल पद्धतीने करुन देण्याचा उद्देश आहे, असे पीएमआरडीएचे नवनिर्वाचित अपक्ष सदस्य यशवंत गव्हाणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com