रिक्षाचा संप 'PMP'ला लाभला! एका दिवसांत १५ लाखांपेक्षा जास्त पुणेकरांचा पीेएमपीने प्रवास

पीएमपीच्या तिजोरीत भरघोस उत्पन्न जमा
PMP Latest news  
Punekar news
PMP Latest news Punekar newsSarkarnama

मंगेश कोळपकर

पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी केलेल्या संपामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी, पीएमपीच्या तिजोरीत मात्र पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न जमा झाले आणि १५ लाखांहून अधिक प्रवाशांनी पीएमपीच्या बसचा वापर केला. पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक झाली आहे.

यापूर्वी ४ जानेवारी २०१६ आणि १४ नोव्हेंबर रोजी दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा पीएमपीला पार करता आला होता. परंतु, त्या वेळी पास विक्रीची रक्कम २० लाखांहून जास्त होती. यंदा प्रथमच निव्वळ तिकिट विक्रीतून उत्पन्न वाढले आहे. पीएमपीने दोन्ही शहरांबाहेरील जिल्ह्यातील ११ मार्गांवरील वाहतूक २६ नोव्हेंबर रोजी बंद केली आहे. त्यामुळे त्या मार्गांवरील १०० बसही शहरातंर्गत वाहतुकीसाठी पीएमपीला वापरता आल्या.

-पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या आणि ई- बसची संख्या वाढत आहे. या बसचा प्रवास आरामशीर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांचा पीएमपीकडे वाढता कल असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

PMP Latest news  
Punekar news
सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीस सरकारला दिलासा; 'आरे'कारशेडबाबत 'हा' मोठा निर्णय

पीएमपीएमएल स्थापनेपासून (२००७) प्रथमच.......

- निव्वळ तिकीट विक्रीतून मिळाले १ कोटी ९२ लाख ८ हजार ९६८ रुपये तर, पास विक्रीतून १२ लाख ६२ हजार आणि एकूण उत्पन्न २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रुपये

- एकूण १७४० बस रस्त्यावर धावल्या; एरवी पीएमपीच्या सरासरी १६०० बस रस्त्यावर असतात

- एकूण १५ लाख ४७ हजार प्रवाशांनी केला बसचा वापर

PMP Latest news  
Punekar news
Maval : मावळातील स्थानिकांच्या हक्कासाठी शेळके-भेगडे सरसावले...

कोरोना काळात बंद झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरून ८ मार्गांवरील पीएमपीची बससेवा आता पूर्ववत करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पुणे स्टेशनजवळील मोलेदिना बसस्थानक येथून बस सुटल्यावर पुणे रेल्वे स्टेशन समोरील लेन क्रमांक ४ येथे प्रवाशी चढ-उतार करून नियमित मार्गाने वाहतूक करणार आहेत. वाहतूक बुधवारपासून (ता. ३०) सुरू होणार आहे

या मार्गांवरील वाहतूक होणार सुरू

१- ५७ - पुणे स्टेशन ते वडगांव/वेणूताई कॉलेज

२- १४४ - पुणे स्टेशन ते एनडीए गेट नं. १०

३- १४०- पुणे स्टेशन ते अप्पर डेपो

४ - ३३३ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते हिंजवडी

५ - १५८ - म.न.पा. भवन ते डी. वाय. पाटील कॉलेज

६ - १६३ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज

७ - ३१२ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते पुणे स्टेशन ते चिंचवडगांव

८ - १५८ - म.न.पा. भवन ते डायमंड वॉटर पार्क, दादाची पडळ (वाघोली)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com