PMC : सुरेश कलमाडी १० वर्षानंतर पालिकेत आले; सर्वांच्या भुवया उंचावल्या !

पुण्याच्या राजकीय वर्तुळात एक घटना आज मोठी चर्चेची ठरली.
Suresh Kalmadi
Suresh KalmadiSarkarnama

पुणे : पुण्याच्या राजकीय वर्तुळात एक घटना आज मोठी चर्चेची ठरली. पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी (Suresh Kalamadi) तब्बल दहा वर्षानंतर पुणे महापालिकेत आले. सप्टेबर महिन्यात होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या (Pune Festival) तयारीचा भाग म्हणून त्यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार (Vikramkumar) यांची भेट घेतली. या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक असलेल्या पालिकेने आवश्‍यक ते सर्व सहकार्य करावे, अशी विनंती कलमाडी यांनी आयुक्त कुमार यांना केली.

Suresh Kalmadi
राज्याप्रमाणे ‘गोकुळ’मध्येही सत्तांतर होणार का..? सतेज पाटील स्पष्टच बोलले...

पुणे फेस्टिव्हलचे हे ३४ वे वर्ष आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे हा महोत्सव झाला नव्हता.गणेशोत्सवाबरोबरच यावर्षी पुणे फेस्टिव्हल मोठ्या दिमाखात करण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला आहे.या पाश्‍र्वभूमीवर कलमाडी यांनी आयुक्त कुमार यांची भेट घेऊन महापालिकेने या महात्सवाला सर्वोतोपरी मदत करावी,अशी मागणी केली. या फेस्टिव्हलच्या पहिल्या वर्षापासून महापालिका सहप्रायोजक आहे. महापालिका फेस्टिव्हलसाठी दरवर्षी विविध सुविधा देण्याबरोबरच थेट अर्थिक मदत करीत असते.

Suresh Kalmadi
शिवसेनेच्या भात्यात आता 'तेजस अस्त्र'

फेस्टिव्हलसाठी गणेश कला क्रिडा केंद्र तसेच बालगंधर्व व कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाते.मात्र, मेट्रोच्या कामामुळे गणेश कला क्रिडा केंद्रांचे मराठा चेंबरच्या बाजूचे प्रवेशद्वार सध्या बंद आहे.कोथरूडच्या नाट्यगृहाचे काम सुरू आहे. या सर्व ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात येईल.फेस्टिव्हलसाठी कोणतीही अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे आश्‍वासन आयुक्त कुमार यांनी दिले.

फेस्टिव्हलच्या तयारीचा भाग म्हणून आयुक्तांना भेटण्यासाठी आज पालिकेत आल्याची वार्ता पालिकेच्या सर्व विभागात वाऱ्यासारखी पसरली.पालिकेतील अनेक जुने कर्मचारी उत्सुकतेने बाहेर येऊन कलमाडी यांना पाहात होते.१९९५ ते २००७ या काळात कलमाडी यांचे पुणे पालिकेत एकहाती नेतृत्व होते.मधल्या काळात कलमाडी आजारी होते.त्यामुळे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्या पालिकेतील अचानक येण्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in