मोठी बातमी : इंदापूर तालुक्यात शिकाऊ विमान कोसळले; पायलट युवती जखमी

यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले होते.
Plane crashes in Indapur
Plane crashes in IndapurSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : पुणे (Pune) जिल्ह्याच्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील कडबनवाडी येथे आज (ता. २५ जुलै) शिकाऊ विमान कोसळले (Plane crashes). या विमानाने बारामतीतून उड्डाण केले होते. या अपघातात पायलट युवती किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सुदैवाने हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले होते. (Plane crashes in Indapur taluka; Young pilot injured)

या अपघातात जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी पायलट युवतीचे नाव भावना राठोड असे आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले. बारामती येथील शिकाऊ विमान घेऊन पायलट युवती कसरत करत असताना हे विमान कोसळले आहे. हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. शिकाऊ विमानाच्या सहाय्याने कसरत करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Plane crashes in Indapur
नाराज चंद्रकांत हंडोरे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार..? हंडोरे म्हणाले...

ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले. त्यांनी पायलट तरुणीला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या तरुणी पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून विमानाची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले आहे.

Plane crashes in Indapur
काँग्रेस आमदारांनीच क्रॉस व्होटिंग करत माझा पराभव घडविला : चंद्रकांत हंडोरेंनी मौन सोडले!

दरम्यान, विमानात असणारी प्रशिक्षणार्थी युवती पायलट ही किरकोळ जखमी झाली आहे. विमान दुर्घटनेची घटना यापूर्वीही इंदापूर तालुक्यात घडली आहे. या पूर्वी ५ फेब्रुवारी २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले होते. त्या अपघतात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला होता. या वेळी प्रशिक्षणार्थी युवती पायलट जखमी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com