Thackeray Group : पिंपरीत ठाकरे गट आक्रमक : महिला संघटक, उपशहर प्रमुखांसह आठ जणांची हकालपट्टी; 'हे' आहे कारण !

Chinchwad By poll Election : पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई
Thackeray Group Symbol-Mashal
Thackeray Group Symbol-MashalSarkarnama

Maharashtra Politics : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याचा परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होण्याची शक्यता मानली जात आहे. त्यातूनच त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यानंतर पक्षाने पक्ष आदेशाविरोधात काम केल्याने आठ जणांची हकालपट्टी केली आहे. यात पक्षाच्या महिला संघटकाचाही समावेश आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad) ठाकरे गटाच्या आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका आठ जणांवर ठेवला आहे. यात ठाकरे गटाच्या महिला संघटक अनिता तुतारे यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे. त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली. ही कारवाई शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार (Gautam Chabukswar) यांनी केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चा रंगू लगल्या आहेत.

Thackeray Group Symbol-Mashal
Ashok Chavan News : माझा मेटे करा, अशा चर्चा सध्या सुरू आहेत, चव्हाणांचा खळबळजनक आरोप..

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Chinchwad) महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (MVA) आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या नात्याने ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काटे यांचा प्रचार करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे. तसेच विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला होता.

Thackeray Group Symbol-Mashal
Bhagat singh Koshyari : बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात कोश्यारींचा मोठा गौप्यस्फोट :‘ मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो; पण...’

या पार्श्वभूमीवर आठ जण पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. यात चिंचवड विधानसभेच्या महिला संघटक अनिता तुतारे, शहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवि घटकर यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in