Pimpri Chinchwad News : पिंपरीचं राजकारण तापलं : 'आमदार लांडगे दुटप्पी' ; राष्ट्रवादीच्या गव्हाणेंचा हल्लाबोल

Ajit Gavhane Vs Mahesh Landage : लांडगेंबद्दल नेमकं काय म्हणाले गव्हाने?
Pimpri Chinchwad News : Ajit Gavhane : mahesh Landge
Pimpri Chinchwad News : Ajit Gavhane : mahesh LandgeSarkarnama

पिंपरीः कचरा संकलन सेवा शुल्काच्या (उपयोगकर्ता शुल्क) नावे घरटी दरमहा 60 रुपये शुल्क या महिन्यापासून आकारण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्याला कडाडून विरोध सत्ताधारी भाजपच नाही, तर विरोधी बाकावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आता विरोध केला आहे. (Pimpri Chinchwad News)

भाजपचे शहर अध्यक्ष आणि कारभारी आमदार भोसरीचे महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी या कराला विरोध करीत तो रद्द करण्याची मागणी पालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे काल केली. त्यानंतर राष्ट्रवादीनेही त्याला कडाडून विरोध आज केला. मात्र, तो करताना त्यांनी भाजपलाच लक्ष्य केलं. उपयोगकर्ता शुल्कावरून भाजपाने जनतेला वेड्यात काढण्याचे धंद्दे बंद करावे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी केला.

Pimpri Chinchwad News : Ajit Gavhane : mahesh Landge
Chandrakant Patil : 'ठाकरे-शिंदेंनी एकत्र येऊन, खोके वगैरे थांबवलं पाहिजे'; मी पुढाकार घ्यायला तयार : पाटलांची भूमिका!

हे नवे कचरा शुल्क तथा कर लागू करण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो रद्द करावा, अशी सूचना भाजप शहराध्यक्षांनी केली. मात्र, राज्यात भाजपची सत्ता असून पालिकेत त्यांच्या मर्जीतीलच आयुक्त आहेत. असे असताना हा कर लागू करायचा आणि नंतर तो रद्द करण्याची मागणी करायची, यातून भाजप शहराध्यक्षांची दुटप्पी भूमिका समोर येते, असा टोला गव्हाणेंनी आमदार लांडगेंचे नाव न घेता लगावला.

Pimpri Chinchwad News : Ajit Gavhane : mahesh Landge
Nanded Loksabha News : महाविकास आघाडीला संधी, पण अशोकरावांनी मनावर घेतले तर..

यातून भाजपवाल्यांनी जनतेला वेड्यात काढण्याचे धंदे बंद करावेत. जनता महागाईने होरपळत असताना सेवा शुल्क लागू करून त्यांच्या जखमेवर मोठी चोळण्याचे काम भाजपवाले करत आहेत. त्यांना सातत्याने जनतेची दिशाभूल करण्याची सवयच जडली असल्याची, कोपरखळी त्यांनी मारली. शेखर सिंह आयुक्त म्हणून आल्यापासून अनेक उलटसुलट निर्णय घेत आहे. कोट्यावधी रूपयांच्या निविदांना मंजुरी देण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. भाजप नेत्यांच्या दबावाखाली विविध कामांना खैरात वाटल्यासारखे कोट्यावधी रूपये वाढीव देत असल्याचा आरोपही गव्हाणेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com