Pimpri News : पिंपरीत सेवा विकास बँकेवर ईडीचे छापे; पुण्यात शाळा चालकावरही कारवाई

Pimpri News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डब्बू आसवानी आणि उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी ई़डी चौकशीची मागणी केली होती.
Pimpri Chinchwad News : ED
Pimpri Chinchwad News : EDSarkarnama

पिंपरीः सिंधी व्यापाऱ्यांची बँक समजल्या जाणाऱ्या पिंपरीतील सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बँकेतील ४३० कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अंमलबजावणी संचालनालय अर्थात `ईडी`ने आज बँकेचे माजी अध्यक्ष अमर साधुराम मुलचंदांनी यांच्या पिंपरी कॅम्पातील निवासस्थानी सकाळीच छापा टाकला. यामुळे पिंपरी बाजारपेठेत आणि सिंधी समाजात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सेवाविकास घोटाळ्यात सहभागच नाही, तर आरोपीही असलेल्या पुण्यातील वकिल तसेच एका शाळाचालक अशा दोघांवरही ईडीने एकाचवेळी आज छापेमारी केली. त्यांची ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरुच होती. मुलचंदानी यांच्या घराची झाडाझडती चार अधिकारी घेत आहेत. त्यांच्या बंगल्याबाहेर स्थानिक पोलिसांसह सीआय़एसएफचा बंदोबस्त आहे. त्यात महिला अधिकारीही आहेत.

Pimpri Chinchwad News : ED
Rahul Gandhi : यात्रेत नेमकं काय घडलं, की राहुल गांधींना माघार घ्यावी लागली

सेवाविकास बॅंकेत तत्कालीन संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा ३७ जणांनी मिळून कोट्यवधीचा हा घोटाळा केल्याचे सहकार खात्याच्या सहनिबंधकांनी केलेल्या तपासणीत २०२१ ला आढळून आले होते. त्यांच्या तक्रारीनुसार पहिला व नंतर असे १६ गुन्हे मुलचंदानी व साथीदारांविरुद्ध दाखल झाले.

पात्रता नसताना तसेच, तारण न घेताही कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य कर्जवाटप करून गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र, त्यात सर्व आरोपींना अटक न होता फक्त मुलचंदानी व इतर चौघांचीच धरपकड झाली, हे विशेष. सध्या ते सर्व जामिनावर बाहेर आहेत. या गुन्ह्यात अटक झालेल्या वकिलाच्या पुण्यातील कार्यालयावर तसेच पुण्यातील एक शैक्षणिक संस्थेच्या चालकावरही ईडीने छापा मारला आहे.

Pimpri Chinchwad News : ED
Prakash Ambedkar : पंतप्रधान मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत : आंबेडकरांनी प्रमाणपत्र का दिलं?

दरम्यान, सेवाविकासप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाल्यानंतर ४ जुलै २०११ ला या बॅंकेवर रिझर्व बॅंकेने निर्बंध टाकत प्रशासक नेमला. मात्र, त्यानंतर सुद्धा कारभार सुधारला नाही, म्हणून बॅंक चालविण्यासाठी पुरेसे भांडवल नसल्याचे कारण देत गेल्यावर्षी ११ ऑक्टोबरला रिझर्व बॅंकेने सेवाविकास बॅंकेचा परवानाच रद्द केला.

यानंतर दोनच दिवसांनी शहराचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमहापौर डब्बू आसवानी आणि उद्योजक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी ई़डी चौकशीची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com