'भाजपच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले पण राष्ट्रवादी ओबीसींना संधी देणार'

केंद्र सरकारने इम्पीरिकल डेटा उपलब्ध करून न दिल्यानेच ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल यांनी केला आहे.
'भाजपच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले पण राष्ट्रवादी ओबीसींना संधी देणार'
PCMC, Yogesh BhelSarkarnama

पिंपरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election-2022) ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) होणार असल्याचे बुधवारच्या (ता.४ मे) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालातून स्पष्ट झाले. त्यावर महाविकास आघा़डी सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसींची हानी झाल्याची प्रतिक्रिया भाजपकडून लगेचच देण्यात आली. त्यावर ओबीसीचे आरक्षण भाजपच्या (BJP) नाकर्तेपणामुळे गेले, असा पलटवार राष्ट्रवादीने केला. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निव़डणुका होणार असल्या, तरी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ओबीसींनाच नाही, तर सर्वधर्मियांना संधी देणार असल्याचे `मविआ`तील राष्ट्रवादीने (NCP) लगेच स्पष्ट केले.

PCMC, Yogesh Bhel
ओबीसीशिवाय निवडणुकीला भाजपचाही पाठिंबा होता : परब यांचा गौप्यस्फोट

ओबीसीचे आरक्षण केवळ भाजपच्या नाकर्तेपणामुळे गेले असून राज्यात त्यांची सत्ता असताना त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय आणि केंद्र सरकारने इम्पीरिकल डेटा उपलब्ध करून न दिल्यानेच ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व शहराचे मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी आज (ता.४ मे) केला. तसेच राजकीय स्वार्थासाठी खोटं बोलण्याची सवय असलेल्या भाजपच्या भूलथापांना बळी न पडता सर्वधर्मियांना समान संधी देणार्‍या राष्ट्रवादीलाच महापालिका निवडणुकीत शहरातील जनता संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षाने आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वधर्मियांना सत्तेचा भागीदार बनविले आहे. त्याला आगामी पिंपरी महापालिकेची निवडणूकही अपवाद नसणार आहे. या निवडणुकीतही मुस्लिम, मागासवर्गीय व सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य प्रमाणात संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

PCMC, Yogesh Bhel
५ महापालिकांच्या निवडणुका तातडीने; वडेट्टीवार यांच्या विधानाने इतर ठिकाणचे इच्छुक टांगणीला

न्यायालयीन निकालावर बहल म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच महापालिका निवडणुका होत असल्या तरी सर्वधर्मांना समान न्याय देण्याचे धोरण राष्ट्रवादीने सुरुवातीपासून अंगिकारलेले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भूमिपूत्रांना न्याय देतानाच बाहेरून आलेल्यांनाही सर्वाधिक संधी राष्ट्रवादीने दिलेली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने नाकारले असले, तरी राष्ट्रवादी या समाजाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांच्यासह मुस्लिम समाजालाही समान संधी देण्याचे राष्ट्रवादीचे तत्त्व राहील. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण यशस्वीपणे राबवून अनेकांना संधी दिली आहे. महिला आरक्षण असो किंवा इतर जातीधर्मियांचे नेतृत्व विकसित करण्याचे कार्य पवारसाहेबांनी तह्यात केले आहे. यापुढेही ते सुरुच राहील, असे बहल यांनी आश्वस्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.