'शिंदे फडणवीस गुजरातचे चाकर, म्हणून चोरली मराठी तरुणांची भाकर'

NCP : शिंदे-फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी, पण करतात गुजरातची चाकरी
Pimpri-Chinchwad NCP News
Pimpri-Chinchwad NCP NewsSarkarnama

पिंपरी : महाराष्ट्रात मावळ (Maval) तालुक्यामध्ये (जि.पुणे) होऊ घातलेला दीड लाख कोटी रुपयांचा, दीड लाख रोजगार निर्मितीचा 'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. हा प्रकल्प जेथे होणार होता, त्या मावळ तालुक्यातील तहसीलदार कचेरीवर काल निषेध मोर्चा काढला. तर, आज पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने त्याविरोधात भर पावसात निषेध आंदोलन केले. (Pimpri-Chinchwad NCP News)

Pimpri-Chinchwad NCP News
२०२४ मध्ये 'शत प्रतिशत' भाजप की शिंदे सरकार? चंद्रकांतदादा म्हणतात, काळ ठरवेल...

"शिंदे फडणवीस गुजरातचे चाकर, म्हणून चोरली मराठी तरुणांची भाकर","घेऊन पन्नास कोटी रुपयांचे खोके,महाराष्ट्रातील युवकांना देतात धोके","शिंदे-फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी, पण करतात गुजरातची चाकरी","गुजरातला उद्योगाचा पेटारा, महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा"आदी मोर्चेकरी तरुणांच्या घोषणांनी परिसर दुमदूमून गेला होता. त्यांचा लक्षणीय सहभाग मोर्च्यात दिसून आला.

पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. त्यात महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर, संजय वाबळे, माया बारणे, मारुती भापकर,ओबीसी सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, काशीनाथ नखाते, इखलास सैय्यद आदींसह मोठ्या संख्येने युवक सामील झाले होते.

Pimpri-Chinchwad NCP News
डॉ. विश्र्वजीत कदम भाजपात येण्याची शक्यता खुद्द चंद्रकांतदादांनीच फेटाळली !

महाराष्ट्रातील दीड लाख युवकांच्या रोजगाराच्या संधी गुजरातच्या घशात घालण्याचे काम केलेले शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरात धार्जिणे असल्याचा हल्लाबोल यावेळी गव्हाणेंनी केला. मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रासोबत ते भेदभाव करत आहेत,असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा प्रकार मागच्या आठ वर्षापासून सुरु आहे, असे ते म्हणाले. तर,"प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ,असे म्हणणाऱ्या भाजपने त्या दिल्या, तर नाहीच, उलट त्या हिरावून घेतल्या, असे शेख म्हणाले.

फडणवीस हे तीन दिवसाचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र, एन एस जी, मरीन पोलीस अकॅडमी, केंद्रीय यंत्रणाचे कार्यालय,आंतरराष्ट्रीय हिरे मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुंबईचे मुख्यालय, असे अनेक उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये गुजरातला हलवली,असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in